माद्रिद (स्पेन) – स्पेन पोलिसांनी १४ पाकिस्तान्यांना अटक केली आहे. हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्याच्या दृष्टीने यांना अटक करण्यात आली आहे. हे १४ जण जिहादी जाळे चालवत होते. हे सर्वजण पाकमधील जिहादी राजकीय पक्ष ‘तहरीक-ए-लब्बैक’शी संबंधित असून ते स्पेनच्या कॅटालूनिया, वालेंसिया, लोग्रोनो आणि विटोरिया या शहर अथवा राज्ये यांत रहात होते. ते जिहादचा प्रसार करण्यासाठी जिहादी साहित्य प्रसारित करत होते. यासमवेतच धर्मांतराचेही काम करत होते.
स्पेनमध्ये अनुमाने १ लाख पाकिस्तानी नागरिक रहातात. त्यातील निम्मे कॅटालूनिया राज्यात रहातात. नोकरीनिमित्त ते स्पेनमध्ये पोचले होते. यातील बहुतेक अवैधरित्या येथे पोचले आहेत.
संपादकीय भूमिकापाकिस्तानी जगाच्या कोणत्याही कोपर्यात गेले, तरी ते जिहादी कारवायाच करणार, यात कुणालाही शंका वाटू नये ! त्यामुळे आता पाकिस्तानला आतंकवादी देश घोषित करणेच योग्य ! |