गेल्या ९ वर्षांत आम्ही जेवढे काम केले, तेवढे अनेक दशकांत झाले नाही ! – पंतप्रधान मोदी

भारत-बांगलादेश यांच्यातील संबंधांविषयी पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य !

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना

नवी देहली – भारत आणि बांगलादेश यांच्या यशस्वीतेसाठी आम्ही काम करत आहोत. आमचे संबंध सातत्याने उंची गाठत आहेत. गेल्या ९ वर्षांत आम्ही मिळून जेवढे काम केले आहे, ते गेल्या अनेक दशकांत झालेले नाही, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी १ नोव्हेंबर या दिवीशी दोन्ही देशांतील ३ प्रकल्पांचे उद्घाटन केले. यांमध्ये अखौरा आणि आगरतळा यांना जोडणारी रेल्वे योजना, बांगलादेशातील मोंगला बंदर रेल्वे मार्ग आणि ‘मैत्री थर्मल पॉवर प्लांट’ यांच्या उद्घाटनांचा समावेश आहे. या प्रसंगी मोदी बोलत होते.

या वेळी शेख हसीना म्हणाल्या की, भारत-बांगलादेश यांच्यातील तीन प्रकल्पांचे उद्घाटन हे आमची चांगली मैत्री आणि सहकार्य यांचे दर्शन घडवते. पंतप्रधान मोदी यांच्या पुढाकाराने हे शक्य झाले आहे.

संपादकीय भूमिका

यासह बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवर सातत्याने होणार्‍या आक्रमणांविषयी पंतप्रधान मोदी यांनी शेख हसीना यांच्याशी चर्चा करून तेथील हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी समस्त हिंदूंची अपेक्षा आहे !