श्राद्ध

‘श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम्।’, म्हणजे ‘श्रद्धायुक्त अंत:करणाने पितरांना तृप्त करण्यासाठी जे कर्म केले जाते, ते श्राद्ध.’ ‘देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम्।’ (तैत्तिरीयोपनिषद्, शिक्षाध्याय, अनुवाक ११, वाक्य २)
अर्थ : देव आणि पितर यांच्या कार्यात खंड पडू देऊ नये. श्राद्धाच्या अनेक व्याख्या आढळतात, त्यांतील १-२ पाहू.

१. देशे काले च पात्रे च श्रद्धया विधिना च यत्।
पितृनुद्दिश्य विप्रेभ्यो दत्तं श्राद्धमुदाहृतम्॥

अर्थ : देश, काल आणि पात्र यांना अनुलक्षून श्रद्धा अन् विधी यांनी युक्त असे पितरांना उद्देशून ब्राह्मणांना जे अन्नादी दान दिले जाते, त्याला ‘श्राद्ध’ म्हणावे.

२. महर्षि पराशर यांनी श्राद्धाचे लक्षण असे सांगितले आहे –

देशे काले च पात्रे च विधिना हविषा च यत्।
तिलैर्दर्भैश्‍च मन्त्रैश्‍च श्राद्धं स्यात् श्रद्धयान्वितम्॥

अर्थ : योग्य देश, काल अन् पात्रद्वारा हविष्यादि विधीयुक्त, तीळ, यव आणि दर्भयुक्त मंत्राने श्रद्धापूर्वक जे कर्म करतो, ते श्राद्ध.

– विद्याधरशास्त्री करंदीकर

(साभार : मासिक ‘भाग्यनिर्णय’)