भारताच्या दबावाचा परिणाम
ओटावा (कॅनडा) – कॅनडाच्या पोलिसांनी आेंटारियो प्रांतातील बॅम्प्टन शहरात ८ शीख तरुणांना अटक केली आहे. अवैध कारवायांमध्ये या तरुणांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. भारत आणि कॅनडा यांच्यातील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर ही अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. १८ जून या दिवशी खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण आहेत.
भारत-कनाडा विवाद: निकलने लगी ट्रूडो की हेकड़ी, हथियारबंद 8 सिख युवकों को लेना पड़ा हिरासत में#Indiacanadarelations https://t.co/XSRkDoBeVi
— India TV (@indiatvnews) October 6, 2023
भारत आणि कॅनडा यांच्यातील तणावाचे कारण !
खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप स्वत: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला आहे. या आरोपानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला. भारताने कॅनडाचे आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत. कॅनडामधील भारतीय राजनैतिक अधिकारी आणि भारताच्या राजनैतिक परिसराच्या सुरक्षेविषयी भारताने चिंता व्यक्त केली आहे.