संपत्ती जप्त झाल्यावर गुरपतवंत सिंह पन्नू याची भारताला धमकी !
नवी देहली – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याची पंजाबमधील संपत्ती जप्त केल्यानंतर पन्नू याने भारताला धमकी दिली आहे. ‘माझ्याविरुद्ध कारवाई केल्याने मी गप्प बसणार नाही. आम्ही खलिस्तान बनवणारच’, असे त्याने म्हटले आहे. यापूर्वी पन्नू याने कॅनडातील हिंदूंना देश सोडून जाण्याची धमकी दिली होती.
खालिस्तानी आतंकी गुरपतवंत सिंह पन्नू पर बड़ा एक्शन, NIA ने पन्नू की संपत्ति को किया जब्त…चंडीगढ़ में बना मकान NIA ने किया जब्त #GurpatwantSinghPannu #NIA #westerncountries #canada #india #KhalistanRow #JustinTrudeau pic.twitter.com/FaCcQrATBq
— India TV Hindi (@IndiaTVHindi) September 24, 2023
संपादकीय भूमिकादेशाच्या फाळणीनंतर पंजाब प्रांताचा ६२ टक्के भाग पाकिस्तानात गेला. पूर्वी पंजाबवर राज्य करणार्या शीख राजांची राजधानी लाहोर होती. ‘स्वतंत्र खलिस्तान’ करण्याची मागणी करणारे खलिस्तानी आतंकवादी याविषयी अवाक्षरही काढत नाहीत. यातून त्यांचा बोलविता धनी कोण आहे, हे स्पष्ट आहे ! |