‘आध्‍यात्मिक उपाय सद़्‍गुरु’ असलेले सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची आध्‍यात्मिक गुणवैशिष्‍ट्ये ! 

‘सद़्‍गुरु मुकुल गाडगीळकाका हे दत्तावतारी संत योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन आणि गणेशावतारी संत परात्‍पर गुरु पांडे महाराज यांच्‍याप्रमाणेच ऋषितुल्‍य व्‍यक्‍तीमत्त्व असून तेही श्री गणेश आणि शिव यांचे अंशावतारी समष्‍टी संत आहेत. अशा थोर विभूतीच्‍या चरणी हे लेखपुष्‍प कृतज्ञताभावाने समर्पित करत आहे. या लेखाचा काही भाग आपण १९ सप्‍टेंबर या दिवशी पाहिला. त्‍याचा उर्वरित भाग येथे देत आहे.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

 

१०. सारांश

कु. मधुरा भिकाजी भोसले

अशा प्रकारे सद़्‍गुरु गाडगीळकाकांमध्‍ये विविध प्रकारचे दैवीबळ, दैवी तेज आणि दैवी गुण कार्यरत असल्‍यामुळे त्‍यांचे दर्शन, मार्गदर्शन, सत्‍संग आणि सेवा इतकेच नव्‍हे, तर त्‍यांचे संपूर्ण अस्‍तित्‍व विश्‍वातील प्रत्‍येक जिवासाठी परम कल्‍याणकारी आहे. त्‍यामुळे सद़्‍गुरु गाडगीळकाकांची आध्‍यात्मिक वाटचाल विहंगम गतीने परात्‍पर गुरुपदाकडे चालू असल्‍याचे जाणवते. ते ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर आठवले यांचा सूक्ष्म जगताचे ज्ञान देणे, विविध सूक्ष्मातील प्रयोग करणे आणि साधकांवर आध्‍यात्मिक उपाय करून त्‍यांना व्‍यष्‍टी अन् समष्‍टी साधनेच्‍या संदर्भात मार्गदर्शन करणे’, या दैवी कार्याचा वारसा पुढे चालवत आहेत. अशा प्रकारे सद़्‍गुरु गाडगीळकाका यांच्‍या रूपाने सनातन संस्‍थेला एक अनमोल संतरत्न प्राप्‍त झाले आहे. यासाठी देवता आणि श्री गुरु यांच्‍या चरणी आम्‍ही सर्व साधक कृतज्ञताभावाने नमन करतो.

११. कृतज्ञता

‘श्री गुरूंच्‍या कृपेमुळेच ऋषितुल्‍य असणार्‍या सद़्‍गुरु गाडगीळकाकांची गुणवैशिष्‍ट्ये लेखबद्ध करता आली’, यासाठी मी श्रीगुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘त्‍यांच्‍याप्रमाणे आम्‍हा साधकांमध्‍येही दैवी गुणांची वृद्धी होवो’, हीच ईश्‍वराच्‍या चरणी विनम्र प्रार्थना आहे.’

(समाप्‍त)

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.९.२०२३ सायंकाळी ४.३० ते ५.०५)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.