नम्र, प्रेमळ आणि सतत परेच्‍छेने वागणार्‍या ६५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या म्‍हापसा (गोवा) येथील सौ. प्रणिता आपटे (वय ५३ वर्षे) !

म्‍हापसा, गोवा येथील साधकांना सौ. प्रणिता आपटे यांच्‍याविषयी जाणवलेली सूत्रे !

म्‍हापसा (गोवा) येथील सद़्‍गुरु सुशीला आपटेआजी आणि त्‍यांच्‍या ६५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सूनबाई सौ. प्रणिता आपटे गुरुदेवांना भेटण्‍यासाठी अधूनमधून आश्रमात येतात. त्‍यांच्‍या संपर्कात असलेल्‍या म्‍हापसा येथील काही साधकांना सौ. प्रणिता आपटे यांच्‍याविषयी जाणवलेली काही वैशिष्‍ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

सौ. प्रणिता आपटे

१. सौ. शर्वाणी आगरवाडेकर, म्‍हापसा गोवा

१ अ. हसतमुख आणि उत्‍साही : ‘सौ. प्रणिताकाकू नेहमी घरी आलेल्‍या सर्वांचे उत्‍साहाने, आनंदाने आणि हसतमुखाने स्‍वागत करतात.

१ आ. शांत आणि स्‍थिर : त्‍या घरी नेहमी व्‍यस्‍त असतात. त्‍यांच्‍या घरी नियमित कुणी ना कुणी येत असते. त्‍यांना आराम करायला किंवा बसायलाही वेळ मिळत नाही. त्‍यात त्‍यांना घरातले सर्व जण काही ना काही कामे सांगत असतात; पण त्‍या ‘मी आता थकले आहे. किती करू ?’, असे कधीही म्‍हणत नाहीत. त्‍या ते सर्व सहजतेने स्‍वीकारतात. त्‍यांना कुणी जे काही सांगत असेल, ते सर्व त्‍या ऐकतात. त्‍या नेहमीच शांत असतात. त्‍यांना बघून ‘त्‍यांचा मनोलय झाला आहे’, असेच मला वाटते.’

१ इ. प्रेमळ : आई जशी माहेरी आलेल्‍या आपल्‍या मुलीला खाऊ देते, तसे त्‍या घरी जातांना मला काही ना काही खाऊ देतात. त्‍यामुळे मला ‘त्‍या माझ्‍या आईच आहेत’, असे वाटते.’

२. श्री. शेखर आगरवाडेकर, म्‍हापसा, गोवा

२ अ. घरी येणार्‍यांचे यथायोग्‍य आदरातिथ्‍य करणे : ‘सौ. प्रणिता आपटेकाकू यांच्‍या घरी अग्‍निहोत्र असल्‍याने त्‍या सतत व्‍यस्‍त असतात, तरीही त्‍या घरी आलेल्‍या पाहुण्‍यांचे चांगले आदरातिथ्‍य करतात.

२ आ. कधीही उलट उत्तर न देणे : त्‍यांनी कुटुंबीय किंवा इतर कुणालाही कधीच उलट उत्तर दिले नाही. त्‍या कधीही कुणाशी अयोग्‍य वागल्‍याचे मी बघितले नाही.

२ इ. इतरांचा विचार करणे : एकदा त्‍यांना मला एक स्‍तोत्र द्यायचे होते. त्‍यांनी वेळात वेळ काढून मला ते स्‍तोत्र शोधून दिले.

२ ई. आज्ञापालन करणे : प्रणिताकाकू काम करत असतांना सद़्‍गुरु आपटेआजी त्‍यांना काही ना काही करायला सांगत असतात. प्रणिताकाकू सद़्‍गुरु आपटेआजींनी सांगितलेल्‍या सर्व गोष्‍टी अचूक पूर्ण करतात.’

३. सौ. अंजली नायक, म्‍हापसा, गोवा.

३ अ. अत्‍यंत गुणी असलेल्‍या सौ. प्रणिता आपटे : ‘सौ. प्रणिता आपटेवहिनी २४ घंटे गुरुमाईच्‍या (सद़्‍गुरु आपटेआजींच्या) सेवेत आणि सान्‍निध्‍यात असतात. त्‍यांची परिस्‍थिती स्‍वीकारण्‍याची वृत्ती, इतरांना समजून घेणे, वागण्‍यातील सहजता आणि प्रेमभाव हे गुण प्रामुख्‍याने जाणवतात. त्‍यांच्‍या प्रेमळ आणि नम्र स्‍वभावामुळे त्‍या त्‍यांच्‍या संपर्कातील प्रत्‍येक व्‍यक्‍तीचे मन जिंकतात.

या दैवी कुटुंबाशी आम्‍हाला जोडल्‍याबद्दल गुरुदेवांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

४. सौ. शीला मांद्रेकर, म्‍हापसा, गोवा.

४ अ. प्रेमळ : ‘सौ. आपटेवहिनींच्‍या घरी कुणीही गेले, तरी त्‍या त्‍यांना खाऊ दिल्‍याखेरीज पाठवत नाहीत.  त्‍या सगळ्‍यांची विचारपूस करतात.’

२. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी सद़्‍गुरु आपटेआजी यांना संत म्‍हणून घोषित केल्‍यापासून आतापर्यंत प्रणिताकाकूंनी सद़्‍गुरु आजींची सेवा ‘संतसेवा’, या भावानेच केली आहे. त्‍यामुळेच काकूंची आध्‍यात्मिक प्रगती झाली आहे.’

(सर्व सूत्रांचा दिनांक ३.९.२०२३)

(क्रमश:)