‘भारत सरकारच्या ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI) आणि ‘अन्न अन् औषध प्रशासन’ (FDA) यांसारख्या खाद्यपदार्थांचे प्रमाणिकरण करणार्या शासकीय संस्था अस्तित्वात असतांनाही ‘हलाल प्रमाणपत्रा’द्वारे समांतर इस्लामी अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे. पूर्वी मांसापुरती असणारी मूळ ‘हलाल’ ही इस्लामी संकल्पना आज अन्नधान्य, मिठाई, सौंदर्यप्रसाधने, शाकाहारी पदार्थ, औषधे आदी प्रत्येक क्षेत्रात लागू करण्यात आली आहे. ‘हलाल अर्थव्यवस्था’ ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठे संकट बनले आहे. भारत सरकारने ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या संघटनेला ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्याची मान्यता देणारी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. हे लागू झाल्यास आता चालू असलेली अघोषित हलालसक्ती अधिकृत होईल. या पार्श्वभूमीवर हलाल प्रमाणपत्रासाठी ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या संघटनेस शासकीय मान्यता देऊ नये, अशी मागणी क्रांती मैदान, फोंडा, गोवा येथे १३ सप्टेंबर २०२३ या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.’ (१४.९.२०२३)