हिंदु राष्‍ट्र सेनेच्‍या वतीने बारामती (जिल्‍हा पुणे) येथे प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ वक्‍त्‍या कु. श्रद्धा शिंदे यांचे व्‍याख्‍यान पार पडले !

व्‍याख्‍यानानंतर ध्‍येयमंत्र म्‍हणतांना उपस्‍थित धर्मप्रेमी

बारामती, १२ सप्‍टेंबर (वार्ता.) – आमचा विरोध आतंकवादी कसाबला आहे.  डॉ. एपीजे अब्‍दुल कलाम हे कायम आमच्‍यासाठी आदरणीय आहेत. आमचा विरोध हिंदु राष्‍ट्राचा विरोध करणार्‍यांना आहे. आपण घरातील देवतांच्‍या मूर्ती पितांबरीने घासत बसलो आहोत, तर दुसरीकडे हिंदूंची मंदिरे, गड-दुर्ग धोक्‍यात आले आहेत. ज्ञानवापीसारखी अनेक मंदिरे आहेत की, जेथे त्‍या वास्‍तूखाली महादेव आहेत. त्‍यामुळे सर्वधर्मसमभावाचा डंका पिटवणे थांबवा, असे परखड विचार प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ वक्‍त्‍या कु. श्रद्धा शिंदे यांनी मांडले.

हिंदु राष्‍ट्र सेनेच्‍या वतीने फलटण रस्‍ता येथे झालेल्‍या व्‍याख्‍यानात त्‍या बोलत होत्‍या. या वेळी ७०० धर्मप्रेमी उपस्‍थित होते. कार्यक्रमाची सांगता ध्‍येयमंत्र आणि प्रेरणामंत्र यांनी करण्‍यात आली. या वेळी कु. श्रद्धा शिंदे यांनी ‘लव्‍ह जिहाद’, धर्मांतर, गोहत्‍या, गड जिहाद यांविषयी अवगत करून हिंदु राष्‍ट्राची आवश्‍यकता का आहे ? याविषयी उपस्‍थितांना मार्गदर्शन केले.

विशेष – या वेळी सनातन संस्‍थेच्‍या वतीने ग्रंथप्रदर्शन, तसेच फलक प्रदर्शन लावण्‍यात आले होते.