पुणे येथील अवैध मशिदीचे बांधकाम हटवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा महापालिकेवर मोर्चा !
पुणे – बांधकाम करण्यास अनुमती नसतांनाही पुण्येश्वर मंदिराच्या जागेवर अतिक्रमण केले जात आहे. अतिक्रमण करून बांधण्यात येत असलेल्या इमारतीची आम्ही वीटही काढणार नाही; पण तुम्ही काढली नाही, तर यापुढे महापालिकेला पत्र पाठवून विनंती केली जाणार नाही. आम्ही हे अतिक्रमण पाडण्याचा दिनांक घोषित करू.
छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कह्यातून अनेक मंदिरे वाचवली आहेत. आता आपल्याला पुण्येश्वराचे मंदिर वाचवायचे आहे. महापालिका प्रशासनाने अतिक्रमण पाडून टाकावे. आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका, अशी चेतावणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिली. ४ सप्टेंबर या दिवशी ‘पुण्येश्वर निर्माण समिती’च्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आलेे. या वेळी भाजपचे आमदार महेश लांडगे, भाजपचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, धीरज घाटे, मिलिंद एकबोटे आदी सहभागी झाले होते.
पुण्येश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमणाविरोधात हिंदूंचा जनआक्रोश! | Nitesh Rane | Mahesh Landge @NiteshNRane @MLAMaheshLandge #Pune #Punyeshwar #Maharashtra #News #MahaMTB pic.twitter.com/VzSyYAS7nG
— महा MTB (@TheMahaMTB) September 5, 2023
या वेळी उपस्थित भाजपचे आमदार महेश लांडगे म्हणाले की, धार्मिक स्थळ पाडण्यासाठी आयुक्त विक्रम कुमार यांना ४८ घंट्यांचा वेळ दिला आहे. तुम्ही अतिक्रमण पाडा. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याचे दायित्व तुमच्यावर असेल.
पोलीस आणि इतर विभाग यांच्याशी चर्चा करून पुढील कार्यवाही करू ! – विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका
पुरातत्व विभागाने सदर ट्रस्टला ‘बांधकाम करू नये’, असा आदेश दिल्यानंतरही बांधकाम होत आहे. आम्ही नोटीस बजावली आहे. पोलीस आणि इतर विभाग यांच्याशी चर्चा करून पुढील कार्यवाही करू.
महापालिका कर्मचार्यांकडून निषेध
आमदार नितेश राणे आणि आमदार महेश लांडगे यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांचा एकेरी उल्लेख करत वैयक्तिक पातळीवर टीका केली होती. त्याचा निषेध म्हणून ५ सप्टेंबर या दिवशी पुणे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांनी काळ्या फिती बांधून आंदोलन केले.