मी मरीन; पण सनातन आणि हिंदु राष्ट्र यांविषयी बोलणे सोडणार नाही !

ठार मारण्याची धमकी देणार्‍या धर्मांधाला धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे उत्तर !

बागेश्‍वर धामचे पीठाधीश्‍वर पंडित धीरेंद्र शास्त्री

बारां (राजस्थान) – कुणीतरी अनस अंसारी आहे. त्याने म्हटले आहे की, मी धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना ठार मारणार आहे. जर माझा मृत्यू तुझ्या हातून असेल, तर मी तो सहज स्वीकारीन; कारण जिवंत रहाणे आणि मरणे, हे देवाच्या हातात आहे. आम्ही सनातनचे सेवक आहेत; मात्र एक लक्षात ठेव, मी मरीन; पण सनातन आणि हिंदु राष्ट्र यांविषयी बोलणे सोडणार नाही. मी पाहीन की, तुम्ही किती धीरेंद्रशास्त्री यांना संपवता ?, असे उत्तर बागेश्‍वर धामचे धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी त्यांना ठार मारण्याची धमकी देणारा अनस अंसारी या धर्मांधाला दिले.