(म्हणे) ‘सनातन धर्म अस्पृश्यता मानत असल्याने आम्ही याचा स्वीकार कसा करायचा ?’ – प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

प्रकाश आंबेडकर

मुंबई – सनातन धर्म अस्पृश्यता मानतो. आम्ही याचा स्वीकार कसा करायचा ? असे ट्वीट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ४ सप्टेंबर या दिवशी केले आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांचे पुत्र अभिनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदु धर्माची तुलना डेंग्यू-मलेरिया या आजारांशी केली होती. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनीही अस्पृश्य ठरवून हिंदु धर्माची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न केला.

संपादकीय भूमिका

  • मानवाच्याच नव्हे, तर विश्‍वासाच्या कल्याणाची संकल्पना मांडणारा ‘हिंदु’ हा एकमात्र धर्म आहे, हे प्रकाश आंबेडकर यांना कोण सांगणार ?