सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे मार्गदर्शन !

अन्न ब्रह्म

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

‘अन्न ही ब्रह्मरूपी चेतना आहे. अन्न ग्रहण करतांना आपल्यातील चेतना अन्नातील चेतनेला ग्रहण करत असते. हे एक प्रकारे आत्म्याचे भोजन किंवा चेतनेचा संयोग असतो.

१. अन्नब्रह्माची दोन अंगे

१ अ. स्थूल अंग : स्थूल अन्नात जे अन्नरस असतात, त्यांच्यामुळे मनुष्याच्या स्थूल शरिराचे पोषण होत असते.

१ आ. सूक्ष्म अंग (चेतना) : अन्नाचे सूक्ष्म अंग, म्हणजे अन्नातील चेतनेमुळे आपली अंतर्गत चेतना सुदृढ होते.

२. अन्नातील अन्नरस आणि चेतना ग्रहण करून बाकी राहिलेला अनावश्यक भाग भोजन करणारी व्यक्ती मल-विसर्जनाद्वारे शरिरातून बाहेर टाकते.’

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (१३.१.२०२३)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.