नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा आरोप !
नागाव (जिल्हा कोल्हापूर) – येथील गट क्रमांक ५ ची ग्रामपंचायतीमधील ६३ गुंठे भूमी मुसलमान समाजाने खोटी कागदपत्रे सिद्ध करून स्वतःच्या नावावर केल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी केला आहे. मुसलमान समाजाची ही कृती म्हणजे ‘लँड जिहाद’असून या संदर्भात झालेल्या ग्रामसभेत नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी आक्रमक भूमिका घेत याचा सोक्षमोक्ष लावण्याची मागणी केली आहे.
१. तहसीलदार हातकणंगले यांच्या आदेशाने १० एप्रिल १९९१ प्रमाणे वस्तूस्थितीचा पंचनामा क्षेत्र ‘०.३० आर्’ ही भूमी मराठा, जैन, सुतार, लोहार, मांग, चांभार, वडार, कुंभार, कोष्टी, तसेच इतर समाजातील लोकांसाठी दहनभूमी म्हणून राखीव ठेवण्यात आली आहे. हे सर्व ‘डायरी क्रमांक २८५’ मध्ये नमूद असतांना मुसलमान समाजाने खोटी कागदपत्रे सिद्ध करून ही जागा बळकावली आहे.
२. या संदर्भात झालेल्या ग्रामसभेत खोटी कागदपत्रे सिद्ध करण्यास साहाय्य केलेल्या त्या अधिकार्यांवर फौजदारी नोंद करावी, असा ठराव केला. या संदर्भातील भूमीच्या कागदपत्रांची मागणी श्री. महेश सावंत यांनी माहिती अधिकाराखाली तहसीलदारांकडे केली आहे.
३. गावातील शांतता टिकून रहाण्यासाठी ‘जमात’साठी (मुसलमानांमध्ये करण्यात येणारा धार्मिक कार्यक्रम) येणार्या सर्व मुसलमान लोकांची ग्रामपंचायतीकडे ओळखपत्रासह नोंद ठेवावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली आहे.
४. मुसलमान समाजाने, ‘‘आम्ही खोटी कागदपत्रे जोडलेली नसून आम्ही कोणत्याही समाजाची भूमी बळकावलेली नाही. आम्ही नियमानुसारच केले आहे’, असे स्पष्टीकरण दिले आहे.