बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे माजी नेते रियाजुल हक यांनी त्यांच्या पत्नीला दिली ‘एके-४७’ रायफल भेट !

  • रायफल खोटी असल्याचा रियाजुल हक यांचा दावा !

  • चौकशी करण्याची भाजपची मागणी !

कोलकाता (बंगाल) –  तृणमूल काँग्रेसचे माजी नेते रियाजुल हक यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी पत्नीला ‘एके -४७’ रायफल भेट दिल्याचे छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित केले होते. यावरून टीका झाल्यावर हक यांनी सामाजिक माध्यमांतून छायाचित्र काढून टाकले. त्यांनी ‘ही रायफल खोटी आहे. त्यामुळे त्यात काहीही चुकीचे नाही’, असे सांगितले.


या प्रकरणी बीरभूममधील भाजपचे जिल्हाध्यक्ष ध्रुबो साहा म्हणाले, ‘‘हक यांना ही रायफल कुठे मिळाली ?, याची चौकशी झाली पाहिजे. ते तृणमूल काँग्रेसचे माजी नेते आहेत आणि राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षांचे जवळचे मानले जातात. त्यामुळे राज्यात तालिबानी शासनाला प्रोत्साहन दिले जात आहे का ? हक पुढच्या पिढीला जिहादी बनण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करत आहेत का ?’’

संपादकीय भूमिका

  • एके-४७ रायफल खरी आहे कि खोटी ?, यापेक्षा पत्नीला ती भेट देण्यामागील रियाजुल हक यांनी मानसिकता लक्षात घेणे आवश्यक आहे ! असे नेते यातून त्यांच्या धर्मबांधवांना कोणता संदेश देऊ इच्छित आहेत ?
  • राज्यातील मुसलमानप्रेमी तृणमूल काँग्रेस या प्रकरणाची चौकशी करण्याची शक्यता अल्पच आहे !
  • अशा घटनेनंतर बंगालमधील हिंदूंनी भविष्यात त्यांच्या पुढे कोणती स्थिती येणार आहे ?, हे लक्षात घेऊन जागृत झाले पाहिजे !