दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सौ. स्वाती संदीप शिंदे यांच्या छापून आलेल्या कविता वाचून साधकांनी केलेले कौतुक !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मला विचारले, ‘‘तुला कविता कशा सुचतात ?, कविता दैनिक ‘ सनातन प्रभात’मध्ये छापून आल्यावर साधक काय म्हणतात ?’’ त्यानंतर ‘साधक काय म्हणाले ?’ ते मला आठवले. ते येथे दिले आहे.

सौ. स्वाती शिंदे

१. कविता वाचतांना भाव जागृत होतो.

२. आमच्या मनात जे भाव होते, ते आम्हाला शब्दांत मांडता येत नाहीत. तुझी कविता वाचून ‘मला जे वाटत होते, तेच लिहिले आहे’, असे वाटले आणि मी ती कविता पुनःपुन्हा वाचली.

३. कविता भावपूर्ण आहे.

४. ‘कविता वाचून पुष्कळ आनंद मिळाला’, हे सांगतांना साधकांना पुष्कळ आनंद होतो.

५. ‘कविता दैनिकात आली नाही, तर ‘कविता कधी येणार ? आम्ही दैनिकाची वाट पहात आहोत.’

अशा प्रकारे साधक कवितांविषयी सांगतात.

६. साधकांनी केलेले कौतुक ऐकल्यावर मनात स्वकौतुकाचे विचार न येता ‘गुरुदेव केवळ माझ्यासाठी नाही, तर सर्वांसाठी कविता सुचवतात आणि सर्वांना आनंद देतात. मी केवळ माध्यम आहे’, याची जाणीव होऊन मला पुढील ओळी सुचल्या.’

भाव हा माझ्या मनी ।
वसविला गुरुसाईनी ॥ १ ॥

त्यातून आनंद सार्‍यांना दिधला तयांनी ।
मुक्त हस्ते उधळण करती क्षणोक्षणी ॥ २ ॥

– सौ. स्वाती संदीप शिंदे (६५ टक्के आध्यात्मिक पातळी, वय ३६ वर्षे) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.८.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक