सांस्‍कृतिक कार्य विभागाच्‍या पुरस्‍काराच्‍या रकमेत दुपटीने वाढ ! – सुधीर मुनगंटीवार

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई – गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्‍कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्‍कार, संगीताचार्य अण्‍णासाहेब किर्लोस्‍कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्‍कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्‍त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्‍कार या पुरस्‍कारांची रक्‍कम ५ लाख रुपयांवरून १० लाख रुपये, तर राज्‍य सांस्‍कृतिक पुरस्‍काराची रक्‍कम १ लाख रुपयांवरून ३ लाख रुपये करण्‍यात आली आहे, अशी माहिती सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

सांस्‍कृतिक कार्य विभागाकडून देण्‍यात येणार्‍या विविध पुरस्‍कारांच्‍या निवड समितींच्‍या प्रतिनिधींची बैठक २९ ऑगस्‍ट या दिवशी सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. या बैठकीत पुरस्‍काराच्‍या रकमेत वाढ करण्‍याचा निर्णय घोषित करण्‍यात आला.

युवा कलावंतांसाठी पुरस्‍कार चालू करणार !

सांस्‍कृतिक कार्य विभागाच्‍या वतीने २५ ते ५० वर्षे वयोगटातील कलावंतांसाठी ‘युवा’ पुरस्‍कार चालू करण्‍याचे निर्देश या वेळी सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.