१. रुग्णालयातील व्यक्तींच्या चेहर्यांकडे पाहून ‘त्यांना आध्यात्मिक त्रास आहे’, असे जाणवणे
‘७.७.२०२३ या दिवशी मी एका साधिकेच्या समवेत रुग्णालयात गेले होते. रुग्णालयात अनुमाने १०० व्यक्ती तरी असतील. मी त्या व्यक्तींच्या चेहर्यांकडे पहात होते. मला तेथील सर्व व्यक्तींच्या डोळ्यांमध्ये जिवंतपणा जाणवत नव्हता. सर्वच व्यक्तींच्या चेहर्यांवर आध्यात्मिक त्रास जाणवत होता. त्या ठिकाणी ज्या व्यक्तीला आध्यात्मिक त्रास नाही, अशी एकही व्यक्ती मला दिसली नाही. ते पाहून मला एक क्षण भीती वाटली.
२. साधिकेचा चेहरा पाहून हायसे वाटणे आणि त्याविषयी लक्षात आलेली सूत्रे
नंतर मी माझ्या समवेतच्या साधिकेचा चेहरा पाहिल्यावर मला हायसे वाटले. मला ‘हायसे का वाटले ?’, याचा मी विचार करत होते. त्या वेळी मला पुढील गोष्टी लक्षात आल्या.
अ. एखाद्या मुलामध्ये त्याच्या आई-वडिलांचे गुण आलेले असतात. त्याच्या वागण्या-बोलण्यावरून इतरांच्या ते लक्षात येते. त्याप्रमाणे सनातन संस्थेचा एखादा साधक अनेक लोकांच्या समूहामध्ये असला, तरीही ‘तो सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेे यांचा साधक आहे’, असे लगेच लक्षात येते. सनातनच्या प्रत्येक साधकाच्या चेहर्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील चैतन्याची चमक दिसते.
आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांंनी साधकांना आनंदी रहायला शिकवले असल्याने साधकांच्या चेहर्यावर आनंद दिसतो. सनातनचा साधक अनेक जणांमध्ये असूनही त्याचे वेगळेपण लगेच लक्षात येते. साधकाच्या चेहर्यावरील आनंद आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेे यांच्यातील चैतन्याची चमक तो सनातनचा साधक असल्याचा परिचय करून देते. तीच त्याची ओळख ठरते.
३. कृतज्ञता आणि प्रार्थना
साधक स्थुलातून संपर्कात असला किंवा नसला, तरीही एकाच वेळी सहस्रो साधकांना घडवणारी गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आम्हा सर्व साधकांना लाभली. त्यांच्या चैतन्याचे कवच सतत आमच्या भोवती असल्याने आम्हा साधकांचे रक्षण होते. ‘आम्हा सर्व साधकांना निरपेक्ष प्रेमाने सांभाळणार्या आणि आमचे रक्षण करणार्या गुरुमाऊलींच्या प्रती आमचा अखंड कृतज्ञताभाव राहू दे’, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. श्रद्धा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.७.२०२३)
|