भारताची परराष्‍ट्र धोरणांची चालू असलेली घोडदौड

१. चीनचा बंदोबस्‍त करण्‍यासाठी भारताने घेतलेले ३ महत्त्वाचे निर्णय

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

वर्ष २०२३ मध्‍ये भारताने चीनचा बंदोबस्‍त करण्‍यासाठी ३ महत्त्वाचे निर्णय घेतले.

अ. भारत चीनच्‍या सीमेवरच्‍या १९ जिल्‍ह्यांमधील ३ सहस्र खेड्यांचा चीनशी संघर्षाच्‍या दृष्‍टीने विकास केला जाईल.

आ. ‘इंडो-तिबेटीयन सीमा पोलीस दला’मध्‍ये ९ सहस्र सैनिकांची भरती केली जाईल.

इ. सीमेवर २ कोटी डॉलरचे (१६५ कोटी रुपयांचे) रस्‍ते विकास प्रकल्‍प राबवले जातील.

२. भारताची संरक्षण क्षेत्रातील विक्रमी निर्यात

वर्ष २०२२-२३ मध्‍ये भारताची संरक्षण क्षेत्रातील विक्रमी निर्यात १५ सहस्र ९०० कोटी रुपये झाली. ही निर्यात वर्ष २०१६-१७ मध्‍ये १ सहस्र ५२१ कोटी होती. त्‍यात आता १० पटींनी वाढ झाली. जो देश आशिया खंडातील सर्वांत मोठा ‘शस्‍त्र आयातदार’ म्‍हणून ओळखला जायचा, तो आज आघाडीचा निर्यातदार बनत आहे. पुढील ५ वर्षांत भारताचे २५ सहस्र कोटी रुपयांच्‍या निर्यातीचे उद्दिष्‍ट आहे.

– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्‍ट्र धोरणांचे विश्‍लेषक

(साभार : डॉ. शैलेंद्र देवळाणकर फेसबुक पेज)