‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट’च्या वतीने पुणे येथे अधिक मास निमित्त सहस्रब्राह्मण भोजन !

पुणे – येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने अधिक मासाच्या निमित्त सहस्रब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. धुंडीराज गणेशाचा हा महिना असून मंदिरातील अतीरुद्र, चतुर्वेद स्वाहाकार, श्री गणेश सहस्रनाम कोटी अर्चना यांचा समारोप ब्राह्मण भोजनाने झाला.

मुकुंदनगरमधील शिवशंकर सभागृह येथे झालेल्या सहस्रब्राह्मण भोजनास पुण्यातील १ सहस्र २१ ब्राह्मण उपस्थित होते. श्री गणरायाची आरती करून भोजनास प्रारंभ झाला. ट्रस्टच्या वतीने अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच घेण्यात आला. या कार्यक्रमास चारही वेदांचे अध्ययन करणार्‍या गुरुजींनी मोठया संख्येने उपस्थिती लावली. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पं. वसंतराव गाडगीळ, घनपाठी वेदमूर्ती प्रकाश दंडगे, जांभेकरगुरुजी, वेदमूर्ती धनंजय घाटे, वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांचे शिष्यवर्ग आदींसह ५ बटू सहभागी झाले होते.