गर्जा भारत देश महान !

प्रा. बाबासाहेब सुतार

चंद्रभेटीला पुन्‍हा निघाले, भारतभूमीचे चंद्रयान ।
उरात भरोनी अभिमानाला, गर्जा भारत देश महान ॥

सलाम तुमच्‍या प्रयत्नांना, वंदन तुमच्‍या राष्‍ट्रभक्‍तीला ।
इस्रोमधील ऋषिमुनींना, हात जोडुनि प्रणाम ।
गर्जा भारत देश महान ॥

अपयशाने नाही खचले, नव जोमाने पुन्‍हा झुंजले ।
हृदयाहृदयामधूनी तुम्‍ही, जागवला अभिमान ।
गर्जा भारत देश महान ॥

पृथ्‍वीपासून विलग झाले, चंद्रमाकडे सहज निघाले ।
विज्ञानाच्‍या अचूकतेने, वाट चालते चंद्रयान ।
गर्जा भारत देश महान ॥

आज पुन्‍हा उत्‍सुकतेने, गात्रे फुलती रोमांचाने ।
विक्रम स्‍पर्शूनी चंद्रभूमीला, घडवेल इतिहास महान ।
गर्जा भारत देश महान ॥

– प्रा. बाबासाहेब सुतार, साहाय्‍यक प्राध्‍यापक, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी (२३.८.२०२३)