महर्षि व्‍यासांची वैशिष्‍ट्ये !

‘त्‍या एका ब्रह्माचे रहस्‍य सामान्‍य मनुष्‍य समजू शकणार नाही. त्‍याने ते समजावे, या दृष्‍टीने विस्‍तारपूर्वक कथा, गुरु-इतिहास, दृष्‍टांत वगैरे देऊन जे त्‍याच्‍या चित्ताला परब्रह्म-परमात्‍म्‍याच्‍या ज्ञानाकडे घेऊन जातात आणि अहंकार, द्वेष, स्‍वार्थ दूर करून जीवनात अहंकाराच्‍या जागी निरहंकारिता आणतात, द्वेषाच्‍या जागी क्षमा अन् नम्रतेचा गुण सजवतात, स्‍वार्थाच्‍या जागी निःस्‍वार्थ कर्मयोग आणतात, संकीर्णता (संकुचितपणा) हटवून उदारता आणतात, अशी ज्‍यांची वाणी असेल, उपदेश असेल, अशी ज्‍यांची व्‍यवस्‍था करण्‍याची कला असेल, अशा सत्‍पुरुषांना ‘व्‍यास’ म्‍हटले जाते.’

(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, जून २०२०)