पाकमधील प्रसारमाध्यमांनी ‘चंद्रयान-३’ चंद्रावर उतरतांनाचे थेट प्रक्षेपण करावे !

‘चंद्रयान-२’च्या अपयशाची खिल्ली उडवणार्‍या पाकच्या माजी मंत्र्याचे आता आवाहन !

पाकिस्तानचे माजी माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी संध्याकाळी ६  वाजता ‘चंद्रयान-३’ चंद्रावर उतरतांनाचे थेट प्रक्षेपण करावे, असे आवाहन पाकिस्तानचे माजी माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी ट्वीट करून केले होतेे. ‘मानवजातीसाठी विशेषकरून शास्त्रज्ञांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. भारतातील अंतराळ समुदायाचे खूप खूप अभिनंदन’, असे कौतुकही त्यांनी केले.

विशेष म्हणजे वर्ष २०१९ मध्ये मंत्री असतांना भारताचे ‘चंद्रयान-२’ चंद्रावर कोसळल्यावर फवाद चौधरी यांनी भारतावर कुत्सितपणे टीका केली होती.

संपादकीय भूमिका

पाकच्या माजी मंत्र्याला आता उपरती झाली आहे, हेही नसे थोडके !