छत्रपती संभाजीनगर – एकेकाळी कांदा ५० पैसे किलोच्या दराने विक्री होत होता. त्या वेळी सरकारने शेतकर्यांसाठी ३५० रुपये अनुदान घोषित केले होते; मात्र ते अनुदान अद्याप शेतकर्यांना मिळालेले नाही. अशी परिस्थिती असतांना आता पुन्हा कांद्यावर निर्यात शुल्क लावणे चुकीचे आहे. एकीकडे कापसाचे आयात शुल्क अल्प करता आणि दुसरीकडे कांद्याचे निर्यात शुल्क वाढवता म्हणजे हा देश शेतकर्यांचा आहे कि, कारखानदारांचा आहे ? असा प्रश्न पडतो, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २१ ऑगस्ट या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केला. पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त त्यांनी वेरूळ येथील घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. या वेळी ते बोलत होते.