लडाखमध्ये ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उजेडात !
लडाख – केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण समोर आले आहे. तेथे मंजूर अहमद नावाच्या मुसलमान तरुणाने एका बौद्ध मुलीला पळवून नेले. यावरून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर आरोपी तरुणाच्या वडिलांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्याचे वडील भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष फुंचोक स्टॅनझिन यांनी म्हटले आहे की, लडाखमधील सर्व धार्मिक समुदायांतील लोकांना कुठल्याही महिलेसह पळून जाण्याच्या घटना स्वीकारार्ह नाही.
लडाखमधील बौद्ध समुदाय धर्माबाहेर विवाह करण्याविषयी नेहमीच संवेदनशील आहे. गेल्या काही दिवसांपासून लडाखमधील ‘लव्ह जिहाद’च्या घटनांवरून बौद्ध समुदायामध्ये संतापाची लाट उसळली आहे.