देश अन् धर्म वाचवण्‍याविषयी हिंदु बोलत असेल, तर ते ‘हेट स्‍पीच’ (द्वेषयुक्‍त भाषण) होते का ? – अधिवक्‍ता सुभाष झा, सर्वोच्‍च न्‍यायालय

अधिवक्‍ता  सुभाष झा, सर्वोच्‍च न्‍यायालय

आपल्‍या देशात हिंदूंविरोधात अनेक राजकीय नेते आणि हिंदुविरोधी लोक नियमितपणे ‘हेट स्‍पीच’ करत आहेत, त्‍याविषयी कोणत्‍याही न्‍यायालयात अर्ज प्रविष्‍ट केला जात नाही. ‘हेट स्‍पीच’ म्‍हणजे काय ?’, याची व्‍याख्‍या सुस्‍पष्‍ट होणे आवश्‍यक आहे. सध्‍या न्‍यायाधीश निर्णय देतांना कायदे बनवायला लागले आहेत. कायदे बनवणे, हे न्‍यायाधिशांचे काम नसून ते संसदेचे काम आहे. ‘भारताचे तुकडे होऊ नये, याविषयी हिंदूंनी जनजागृती करणे, हे ‘हेट स्‍पीच’ आहे का ?’, जर हिंदू ‘आपला देश आणि धर्म वाचवण्‍याविषयी बोलत असेल, तर ते ‘हेट स्‍पीच’ आहे का ?’