नाशिक – जिल्ह्यातील चांदवड गावातील मंगरूळ येथील पथकर नाक्यावर ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याप्रकरणी पोलिसांनी कर्मचारी शेहबाज कुरेशी याला कह्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. कुरेशी याला निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती पथकरनाका व्यवस्थापक मनोज पवार यांनी दिली. १५ ऑगस्ट या दिवशी देशात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात येत असतांना कुरेशी याने ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. त्यामुळे पथकरनाक्यावर काम करत असलेल्या इतर कर्मचार्यांनी आश्चर्य व्यक्त केले. स्थानिकांनी त्वरित या घटनेची माहिती पोलिसांना दिली.