पालघरमधील ६५ गावे दरडप्रवण !

दरडप्रवण क्षेत्र 

(दरडप्रवण म्‍हणजे दरड कोसळू शकतात अशी)

पालघर – जिल्‍ह्यात ६५ गावे दरडप्रवण असून त्‍यांना इर्शाळवाडीसारखा धोका असल्‍याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. जिल्‍हा प्रशासनाने डोंगराखालील गावांचे सर्वेक्षण करून भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्‍थेकडे ही सूची पाठवली आहे. यातील वसई तालुक्‍यातील १८ गावांना अधिक धोका आहे. डहाणूतील ९, मोखाड्यातील ११, जव्‍हारमधील १०, वाड्यातील ५, तर पालघरमधील ४ अशी गावांची सूची आहे.