आय.सी.एस्. होऊनही नेताजी सुभाषचंद्र बोस ब्रिटिशांच्या चाकरीत रमले नाहीत. इंग्रजांच्या स्थानबद्धतेतून निसटल्यानंतर त्यांनी जपानमधून ‘आझाद हिंद सेने’च्या माध्यमातून क्रांतीकार्य आरंभले. ‘आझाद हिंद सेने’ने इंफाळ, कोहिमा या मार्गे भारतात प्रवेश करून तेथील प्रदेश स्वतंत्र केला आणि ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूंगा ।’, ही घोषणा सार्थ ठरवली.