‘हल्ली शिक्षण म्हणजे एक प्रकारे चाकरी करून भाकरी मिळवण्याचा धंदा झाला आहे. हे शिक्षण नव्हे, तर हमाली आहे. त्यापासून राष्ट्राचा उत्कर्ष न होता, उलट राष्ट्राची अवनती होण्याच संभव अधिक आहे. ‘मी राष्ट्राकरता मरण्यासदेखील सिद्ध आहे’ अशी बुद्धी राष्ट्रातील तरुणांत उत्पन्न झाली पाहिजे. हे ज्या शिक्षणाने होईल ते ‘राष्ट्रीय शिक्षण’ !
– लोकमान्य बाळ गंगाधर टिळक