राष्‍ट्राभिमान जागृत करण्‍यासाठी करावयाच्‍या कृती !

  • राष्‍ट्रध्‍वजाचा अवमान रोखणे
  • क्रांतीकारकांच्‍या चरित्रांचा अभ्‍यास करून त्‍यांची मूल्‍ये कृतीत आणणे
  • राष्‍ट्रभक्‍तीपर गीतांचे पाठांतर करणे आणि ती समूहाने गाणे
  • क्रांतीकारकांची घोषवाक्‍ये आणि छायाचित्रे घरी लावणे
  • आपले आदर्श म्‍हणून एका तरी क्रांतीकारकाची निवड करणे
  • परिचितांच्‍या वाढदिवसाला क्रांतीकारकांचे चित्र किंवा त्‍या संदर्भातील छोटी माहिती पुस्‍तिका भेट म्‍हणून देणे
  • आपल्‍या परिचित शाळा-महाविद्यालय येथे पूर्ण ‘वन्‍दे मातरम्’ म्‍हणण्‍यास प्रवृत्त करणे
  • राष्‍ट्रगीताचा अवमान होत असल्‍यास तो रोखणे.

पुढील संकल्‍प स्‍वातंत्र्यदिनापासून करूया !

  • स्‍वत: स्‍वसंरक्षण प्रशिक्षण घेईन आणि इतरांनाही त्‍यासाठी प्रवृत्त करीन.
  • समाज, राष्‍ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्‍यासाठी प्रतिदिन किमान १ घंटा  (तास) देईन.
  • चीन, पाकिस्‍तान, बांगलादेश  आदी शत्रूराष्‍ट्रांची उत्‍पादने खरेदी करणार नाही.
  • मी स्‍वत: कुठेही लाच देणार नाही. मी भ्रष्‍टाचार निर्मूलनासाठी प्रयत्न करीन.
  • परिसरात अपरिचित व्‍यक्‍तींच्‍या संशयास्‍पद हालचाली दिसल्‍यास पोलिसांना तात्‍काळ कळवीन.
  • माझा परिसर, माझे गाव, माझे शहर स्‍वच्‍छ ठेवण्‍यासाठी प्रयत्न करीन आणि इतरांनाही त्‍यासाठी प्रवृत्त करीन.