भारताचे गौरवगान आणि भविष्‍यातील आव्‍हाने !

१५ ऑगस्‍ट १९४७ या दिवशी भारताला स्‍वातंत्र्य मिळाले. स्‍वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्‍यानंतर देश काही क्षेत्रांमध्‍ये गरुडभरारी घेत आहे, तर काही क्षेत्रांमध्‍ये विकास होण्‍यासाठी आपल्‍याला अजूनही परिश्रम करावे लागणार आहेत. विकसनशील देशांच्‍या सूचीतून विकसित देशाच्‍या सूचीत जाण्‍यासाठीचा भारताचा हा प्रवास मोठा आहे. त्‍यासाठी विकासाच्‍या मार्गावर गतीमान होतांना देशातील बहुसंख्‍यांकांचे अधिकार आणि हित, तसेच त्‍यांच्‍या जीविताच्‍या रक्षणाची मोठी आव्‍हाने समोर आहेत. देशातील बहुसंख्‍य सुरक्षित असले, तर देश सुरक्षित असणार आहे. देशाच्‍या प्रगतीची झेप जाणून घेत असतांना देशाने कोणत्‍या गोष्‍टींवर अधिक लक्ष देण्‍याची आवश्‍यकता आहे ? हे स्‍वातंत्र्यदिनाच्‍या निमित्ताने जाणून घेऊया.

संकलक : श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

भारताचे स्‍थान आंतरराष्‍ट्रीय पातळीवर अधोरेखित !

पंतप्रधान नरेंद्र मोदी डोळ्‍यांत तेल घालून भारताच्‍या परराष्‍ट्रनीतीची आखणी करत आहेत. अनेक देशांचे दौरे करून महत्त्वपूर्ण करार करणे, देशांना त्‍यांच्‍या संकटकाळात भारताकडून जमेल तितके साहाय्‍य करणे या माध्‍यमांतून त्‍यांनी अनेक देशांना राजकीयदृष्‍ट्या जोडले आहे. अमेरिका, फ्रान्‍स, जर्मनी, काही आखाती देश एवढेच नव्‍हे, तर संयुक्‍त राष्‍ट्रांनीही भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जागतिक स्‍तरावरील महत्त्व अन् नेतृत्‍व मान्‍य केले आहे.

ऑस्‍ट्रेलियाच्‍या लोवी इन्‍स्‍टिट्यूटने जाहीर केलेल्‍या ‘एशिया पॉवर इंडेक्‍स २०२१’नुसार, अमेरिका, चीन आणि जपान यांच्‍या नंतर भारत जगातील सर्वांत शक्‍तीशाली देशांमध्‍ये चौथ्‍या क्रमांकावर आहे. उत्‍पादनापासून ते माहिती तंत्रज्ञानापर्यंत, रासायनिक उद्योगापासून इलेक्‍ट्रॉनिक्‍स उद्योगापर्यंत, कृषी क्षेत्रापासून ते सेवा क्षेत्रापर्यंत भारत जगाच्‍या नकाशावर आपले अस्‍तित्‍व निर्माण करत आहे.

श्री. यज्ञेश सावंत

निधर्मी शासनप्रणालीकडून सनातन धर्मीय शासनप्रणालीकडे वाटचाल !

भारताच्‍या संसदीय इतिहासात वैदिक मंत्रोच्‍चारात, होमहवन करून, साधू-संत यांना आमंत्रित करून नवीन संसद भवनाचे म्‍हणजेच ‘सेंट्रल विस्‍टा’चे उद़्‍घाटन झाले. नवीन संसद भवनामध्‍ये सेंगॉलची (राजदंडाची) स्‍थापना केली. तेही विधीपूर्वक ! हा एक चांगला पायंडा पाडला गेला. ‘भारत निधर्मी शासनप्रणालीकडून सनातन धर्मीय शासनप्रणालीकडे वळणार आहे’, याचा हा संकेत आहे’, असे हिंदुत्‍वनिष्‍ठ मानतात. जुने संसद भवन ही इंग्रजांची रचना आणि निर्मिती होती. त्‍यातून बाहेर येऊन भारताच्‍या गौरवशाली इतिहासाचे दर्शन घडवणारी ही संसदेची नवीन वास्‍तू आहे.

अर्थव्‍यवस्‍थेची गरुडझेप !

देशाच्‍या अर्थव्‍यवस्‍थेने जगात ५ वे स्‍थान पटकावले आहे. ती ‘क्रमांक ३’ची करण्‍याचा मनोदय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवला आहे. अनेक आंतरराष्‍ट्रीय आर्थिक समीक्षणे करणार्‍या संस्‍थांनी ‘येत्‍या ५ वर्षांत भारताची अर्थव्‍यवस्‍था अमेरिका आणि चीन यांच्‍यानंतर तिसर्‍या क्रमांकावर असेल’, असे सांगितले आहे. पंतप्रधानांच्‍या ‘मेक इन इंडिया’च्‍या महत्त्वाच्‍या प्रकल्‍पाने वेग पकडला असल्‍याने अधिकाधिक आंतरराष्‍ट्रीय आस्‍थापने त्‍यांचे कारखाने भारतात उघडत आहेत. भारताच्‍या परकीय गुंतवणुकीत प्रत्‍येक वर्षी वाढ होत असल्‍याने तिचा परिणाम एकूणच अर्थव्‍यस्‍थेवरही होत आहे.

‘चंद्रयान ३’चे यशस्‍वी प्रक्षेपण !

‘चंद्रयान २’ या ऐतिहासिक मोहिमेद्वारे चंद्रावर रोव्‍हर उतरवण्‍याची भारताची संधी काही तांत्रिक कारणांमुळे थोडक्‍यात हुकली; पण तरीही नव्‍या उमेदीने भारतीय शास्‍त्रज्ञांनी प्रयत्न करून ‘चंद्रयान ३’चे प्रक्षेपण यशस्‍वी केले. चंद्रयानने चंद्राच्‍या कक्षेत प्रवेश केला असून येत्‍या काही दिवसांतच त्‍याची फलनिष्‍पत्ती पहायला मिळेल !

शस्‍त्रांच्‍या निर्यातीत वाढ !

काही वर्षांपूर्वी भारत देश अमेरिका आणि रशिया यांच्‍याकडून शस्‍त्रे आयात करायचा. अनेक दशके असे चालू होते. भारताचा क्षेपणास्‍त्र कार्यक्रम यशस्‍वी झाल्‍याने भारताने अग्‍नी १, अग्‍नी २, अग्‍नी ५, पृथ्‍वी, नाग, आकाश, ब्राह्मोस अशा विविध क्षेपणास्‍त्रांची निर्मिती केली. भारताच्‍या ब्राह्मोस क्षेपणास्‍त्राला फिलीपाईन्‍स, व्‍हिएतनाम या छोट्या देशांकडूनच केवळ मागणी आहे, असे नव्‍हे, तर बलाढ्य रशियाही ती क्षेपणास्‍त्रे खरेदी करण्‍यास उत्‍सुक आहे. भारतीय बनावटीच्‍या ‘तेजस’ या लढाऊ विमानांनाही आता विदेशातून मागणी येत आहे.

अनेक क्षेत्रांमध्‍ये गतीमानता !

रस्‍तेबांधणी असो, मेट्रोचे जाळे उभारणी असो कि रेल्‍वेची गती वाढवणे असो अनेक गोष्‍टींमध्‍ये गतीमानता आली आहे. लाखो किलोमीटर लांबीचे रस्‍ते बांधण्‍यात आले असून पुढील रस्‍तेबांधणीही चालू आहे.

भारतीय चलन स्‍वीकारण्‍यास काही देश सिद्ध !

रशिया, श्रीलंका आणि मॉरिशस येथे भारतीय रुपया आंतरराष्‍ट्रीय चलन म्‍हणून वापरता येणार आहे. आता या तीन देशांनंतर जगभरातील अनेक देशांनी भारतीय चलनाचा स्‍वीकार करण्‍याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकन डॉलरची कमतरता भासत असल्‍याने हे देश भारतीय चलनाकडे वळले आहेत. यामध्‍ये तझाकिस्‍तान, क्‍युबा, लक्‍झेंबर्ग, सुदान या देशांचा समावेश आहे. फ्रान्‍स आणि भारत यांच्‍यातील व्‍यापार रुपयांमध्‍ये होणार आहे. याचा भारतीय अर्थव्‍यवस्‍थेवर चांगला परिणाम होणार आहे.


भारतासमोरील भीषण समस्‍या !

हिंदूंना हिंदु म्‍हणून स्‍वतःची ओळख लपवावी लागली !

नूंह (मेवात) येथे काही दिवसांपूर्वी हिंदूंच्‍या ब्रजमंडल यात्रेवर धर्मांधांकडून भयावह आक्रमण झाले, त्‍यामध्‍ये सरकारी आकड्यांनुसार ४ हिंदू ठार झाले आणि अनेक जण घायाळ झाले. हिंदूंच्‍या अनेक चारचाकी गाड्या पेटवून देण्‍यात आल्‍या. मंदिरात आश्रय घेतलेल्‍या ३ सहस्रांहून अधिक हिंदूंवर धर्मांधांनी गोळीबार केला. पूजेसाठी आलेल्‍या महिलांवर सामूहिक बलात्‍कार झाले, असे त्‍यांच्‍यापैकीच काहींनी सांगितले. हिंदूंनी हिंदु ओळख लपवण्‍यासाठी भगवे कपडे काढले, हिंदु महिलांनी कुंकू पुसले, बांगड्या काढल्‍या ! भारतात बहुसंख्‍य हिंदूंची केवढी ही दु:स्‍थिती !

मणीपूर येथे ख्रिस्‍त्‍यांच्‍या अत्‍याचारांना सामोरे गेलेला हिंदु मैतेई समाज !

आक्रमक आणि स्‍वार्थी ख्रिस्‍ती कुकी समाजामुळे मणीपूर पेटले आहे. तेथे हिंदु मैतेई समाज घुसखोरांमुळे असुरक्षितता अनुभवत होता. त्‍यांची शेतीवाडी, मालमत्ता यांवर घुसखोर अधिकार दाखवू लागले. त्‍यांना अनुसूचित जातीचा दर्जा देण्‍याचे न्‍यायालयाने मान्‍य केले आणि कुकींची आक्रमकता, क्रूरता, खुनशी वृत्ती उफाळून आली. त्‍यांनी मैतेई हिंदूंची हत्‍याकांडे घडवून त्‍यांची संपत्ती, वाहने, घरे यांची पुष्‍कळ हानी केली. हिंदु मैतेई समाज मणीपूरच्‍या काही भागांतून पलायन करून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेत आहे. हिंदूबहुल भारतात वर्ष १९९० मध्‍ये धर्मांधांनी काश्‍मिरी हिंदूंचा वंशविच्‍छेद केला आणि त्‍यांना पलायन करण्‍यास भाग पाडले, तोच भाग मैतेई समाजासमवेत होत आहे.

हिंदु मुली आणि महिला यांची विटंबना रोखा !

कर्नाटकमध्‍ये ३ धर्मांध मुलींनी शेकडो हिंदु मुलींचे प्रसाधनगृहातील व्‍हिडिओ छुप्‍या छायाचित्रकाने चित्रीत करून धर्मांध मुलांमध्‍ये प्रसारित केल्‍याची घटना उघडकीस आली. शेकडो हिंदु मुलींची विटंबना होऊनही देशभर काहीच गदारोळ नाही, ना संबंधित धर्मांध मुलींवर तात्‍काळ कठोर कारवाई झाली ! प्रतिदिन लव्‍ह जिहादची भयावह प्रकरणे उघडकीस येत आहेत. धर्मांध मुले नाव पालटून हिंदु मुली, महिला यांना त्‍यांच्‍या जाळ्‍यात अडकवून तिचे आणि तिच्‍या परिवाराचे आयुष्‍यच उद़्‍ध्‍वस्‍त करत आहेत. ज्‍या ज्‍या वेळी देशात हिंदु स्‍त्रीची विटंबना झाली, तेव्‍हा रामायण, महाभारत घडले आहे. प्रतिवर्षी सहस्रो मुलींचे अपहरण करण्‍यात येत असूनही पोलीस-प्रशासन, हिंदु समाज शांत आहे. देशाच्‍या राजधानीत धर्मांध हिंदु मुलींच्‍या दगडाने ठेचून हत्‍या करत आहेत.

राष्‍ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांचा अवमान रोखणे !

काँग्रेस आणि साम्‍यवादी यांच्‍याकडून स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचा सातत्‍याने अवमान केला जातो. त्‍यांना ‘माफीवीर’ म्‍हणून हिणवले जाते, तसेच त्‍यांनी केलेल्‍या राष्‍ट्रहितैषी कृतींवर विखारी टीका केली जाते. त्‍यांनी केलेल्‍या स्‍फूर्तीदायी, त्‍यागमय कार्याकडे, भोगलेल्‍या हालअपेष्‍टांकडे सोयीस्‍कर दुर्लक्ष केले जाते. छत्रपती शिवरायांचा सामाजिक माध्‍यमांद्वारे अवमान करून क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्‍याच्‍या घटना घडल्‍या आहेत. या घटनांविषयी कठोर कारवाई न केल्‍यामुळे त्‍या पुन: पुन्‍हा घडून सामाजिक स्‍वास्‍थ बिघडते.

आतंकवादाने पुन्‍हा डोके वर काढले ?

महाराष्‍ट्रात विद्येचे माहेरघर असलेल्‍या पुण्‍यात पोलिसांनी आतंकवाद्यांचा मोठा कट उधळून लावला आहे. पुण्‍यात डॉक्‍टर आणि अभियंता असलेल्‍या आतंकवाद्यांना अटक करण्‍यात आली. त्‍यांनी बाँबची चाचणी केल्‍याचेही उघड झाले आहे. त्‍यांनी अनेक ठिकाणी बाँबस्‍फोट करण्‍याचे ठरवले होते. या आतंकवाद्यांना पकडले नसते, तर पुण्‍यासह महाराष्‍ट्र त्‍यांच्‍या घातकी कारवायांनी हादरला असता. १५ ऑगस्‍टला घातपात करण्‍याचा या आतंकवाद्यांचा मोठा कट होता. १५ ऑगस्‍ट असो कि २६ जानेवारी हे राष्‍ट्रीय उत्‍सव भारतियांनी भयाच्‍या सावटाखालीच साजरे करावेत, असाच प्रयत्न आतंकवाद्यांनी आजवर केला आहे.

या ज्‍वलंत प्रश्‍नांच्‍या व्‍यतिरिक्‍त धर्मांतर, भ्रष्‍टाचार, लाचखोरी, लँड जिहाद, हलाल अर्थव्‍यवस्‍था, शेतकर्‍यांच्‍या आत्‍महत्‍या इत्‍यादी अनेक समस्‍यांद्वारे भारत पोखरून निघत आहे. या समस्‍यांची भीषणता आहेच. या समस्‍यांमधून भारताला बाहेर काढून सुराज्‍य निर्माण करण्‍यासाठीची उच्‍च नीतीमत्ता प्रखर राष्‍ट्र आणि धर्माभिमान यांतून निर्माण होणार आहे. ती निर्माण करण्‍याचा आजच्‍या या स्‍वातंत्र्यदिनी संकल्‍प करूया !

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल.