पोलीस आणि प्रशासन यांना धर्मांधांचा पुळका !

‘तुळस ही हिंदूंसाठी अतिशय पवित्र आहे. भगवान विष्णु, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना तुळस वाहिली जाते. केरळमधील एका धर्मांधाने या तुळशीचा अवमान केला आणि त्याची चित्रफीत सामाजिक माध्यमांवर प्रसारित केली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा न नोंदवता ती चित्रफीत पुढे पाठवणार्‍या हिंदु व्यक्तीवर गुन्हा नोंदवून त्याला अटकही केली. त्यामुळे केरळ उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले.

१. केरळमध्ये धर्मांधाकडून पवित्र तुळशीचा अवमान

अब्दुल हकीम या धर्मांधाने पवित्र अशा तुळशीचा अवमान केला आणि त्याची ध्वनीचित्रफीत ‘इन्स्टाग्राम’, ‘फेसबुक’ इत्यादी सामाजिक माध्यमांवर ठेवली. ही चित्रफीत अलापुजी येथील श्रीराज कैमल याने इतरांना पाठवली. त्यामुळे गुरुवायूर पोलिसांनी श्रीराज कैमलच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला कारागृहात टाकले. जामीन मिळण्यासाठी कैमल याने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. त्याने न्यायालयाला सांगितले, ‘‘अब्दुल हकीम हा गुरुवायूर देवस्थानाच्या परिसरात उपाहारगृह चालवतो. त्याच्या नावावर उपाहारगृह आणि वाहन चालवण्याचा परवाना आहे; परंतु त्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा न नोंदवता पोलिसांनी मला अटक केली. मी केवळ चित्रफीत इतरांना पाठवली होती; पण तुळशीचा अवमान अब्दुल हकीम याने केला. त्यामुळे मला तात्काळ जामीन देण्यात यावा.’’

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

२. केरळ उच्च न्यायालयाचा पोलिसांना धर्मांधावर गुन्हा नोंदवण्याचा आदेश

यावर केरळ उच्च न्यायालयाने पोलिसांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले. धर्मांधांच्या हातचा मार खाल्ला, तरी भारताचे पोलीस त्यांना वाचवायचे सोडत नाही. तोच अनुभव येथेही आला. ‘धर्मांध हा मानसिक रुग्ण असल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला नाही’, असे पोलिसांनी सांगितले. केरळ उच्च न्यायालयाला पोलिसांचा हा लटका युक्तीवाद आवडला नाही आणि त्यांनी पोलिसांना फटकारले. ते म्हणाले, ‘‘हिंदु धर्मियांसाठी तुळस ही अतिशय पवित्र वनस्पती आहे. तिचा अशा प्रकारे अवमान करणे, हे हिंदूंच्या धार्मिक भावना भडकावण्यासाठी केलेले दुष्कृत्य आहे. जो व्यक्ती गुरुवायूर देवस्थानाच्या परिसरात उपाहारगृह चालवतो, ज्याच्या नावावर उपाहारगृह आणि वाहन चालवण्याचा परवाना आहे, तसेच जो सामाजिक माध्यमांवर इतका सक्रीय आहे, तो मानसिक रुग्ण कसा असू शकतो ?’’ त्यानंतर उच्च न्यायालयाने या धर्र्मांधाच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्याचा पोलिसांना आदेश दिला.

३. देशभरातील पोलीस आणि प्रशासन यांना धर्मांधांविषयी पुळका

केवळ केरळ पोलिसांनाच नाही, तर देशभरातील पोलिसांसह प्रशासनातील अन्य खात्यातील अधिकार्‍यांनाही धर्मांधाविषयी फारच पुळका असतो. त्यांच्या गुन्ह्याकडे त्यांची सतत डोळेझाक चालू असते. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत धर्मांध मुसलमानांनी कुणाचीही अनुमती न घेता अनधिकृतपणे एका मशिदीचे बांधकाम केले होते.

त्याचा त्रास जवळच रहाणार्‍या श्री स्वामी समर्थ गृहनिर्माण संस्थेतील लोकांना होत होता. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोचल्यानंतर न्यायालयाने ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना फटकारले आणि  अनधिकृत मशीद पाडण्याचा आदेश दिला.

ठाणे महानगरपालिकेने मशीद न पाडता आदेशाकडे दुर्लक्ष केले. याप्रकरणी एक अवमान याचिका प्रविष्ट झाल्यानंतर आयुक्तांनी क्षमापत्र आणि शपथपत्र प्रविष्ट केले. त्यात त्यांनी ‘ते लवकरच सदर अनधिकृत मशीद पाडणार आहेत’, असे सांगितले. ठाणे महानगरपालिकेला काही दिवसांतच रमजान मासाचे निमित्त भेटले आणि त्यांनी मशिदीला हात लावण्यास टाळाटाळ केली. उच्च न्यायालयाने मात्र त्यांचे काहीही ऐकून न घेता स्पष्ट शब्दांत मशिदीचे बांधकाम पाडण्याचा आदेश दिला.

पोलीस आणि प्रशासन यांच्याशी धर्मांध वाईट वागत असतांनाही ते धर्मांधांची अनैतिक कृत्ये पाठीशी घालतात. परिणामी ते पोलीस, प्रशासन आणि सरकार यांना जुमानत नाही. उलट मिळेल तेव्हा त्यांच्यावर आक्रमण करण्यासही मागे-पुढे पहात नाहीत. या सर्व गोष्टी हिंदु राष्ट्राची स्थापना अनिवार्य करतात.’

श्रीकृष्णार्पणमस्तु ।

– पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय.