एका शिबिरासाठी गोव्‍याला जातांना सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्‍यावर प्रवासातील अडचणी दूर होणे

श्री. मयूर बागुल

‘२४.२.२०२३ ते २६.२.२०२३ या कालावधीत असलेल्‍या एका शिबिरासाठी गोव्‍याला जाण्‍यासाठी मी धुळ्‍याहून निघालो. तेव्‍हा बस संथ गतीने धावल्‍यामुळे माझ्‍या पुढील प्रवासाला विलंब झाला. त्‍यामुळे ‘आता माझी पुढील आगगाडी चुकणार’, असे मला वाटले. बस जळगाव सेवाकेंद्रासमोरून जात असतांना मी गुरूंना (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना) तळमळीने प्रार्थना केली. मला जळगावहून भुसावळला आगगाडीने जावे लागणार होते. आगगाडी स्‍थानकावर जाण्‍यासाठी रिक्‍शाही नव्‍हती. एक अनोळखी काका दुचाकीवरून जात होते. त्‍यांनी मला दुचाकीवरून आगगाडी फलाटापर्यंत पोचवले. त्‍यामुळे मला आगगाडीच्‍या वेळेत स्‍थानकावर पोचता आले. तिकीट मिळाल्‍याची निश्‍चिती नसतांना एका अनोळखी व्‍यक्‍तीने आगगाडीतील तिची एक जागा आम्‍हाला दिली. त्‍यामुळे देवाच्‍या कृपेने आमची गोव्‍यापर्यंत जाण्‍याची चांगली सोय झाली आणि गोव्‍याला वेळेत पोचता आले.’

– श्री. मयूर अशोक बागुल, धुळे (२४.३.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक