सोलापूर, १३ ऑगस्ट (वार्ता.) – सोलापूर शहर स्मार्ट सिटी म्हणून घोषित झाल्यानंतर शहरातील अनेक ठिकाणी सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेकडून होम मैदान परिसरात नागरिकांना बसण्यासाठी बाकडे सिद्ध करण्यात आले आहेत. परिसरातील भिंतींवर प्राचीन परंपरांची रेखाटलेली चित्रे आहेत. सध्या या बाकड्यांची अवस्था दयनीय झाली असून बाकड्याला असलेल्या फळ्या अज्ञातांनी काढून नेल्या असल्याने बाकड्यांचा बसण्यासाठी वापर करता येत नाही. फिरायला आलेल्या नागरिकांना थोडा वेळ विसावायचे असल्यास बाकडे असूनही त्यांचा वापर करता येत नसल्याने अप्रसन्नता व्यक्त केली जात आहे.
संपादकीय भूमिकामैदानातील बाकड्यांच्या फळ्या काढून नेल्या जात असतील, तर अशा सोलापूरला ‘स्मार्ट सिटी’ म्हणणे कितपत योग्य ? |