नूंहमध्ये पोलीस आणि गोतस्कर यांच्यात उडालेल्या चकमकीत १ गोतस्कर घायाळ

२१ गोवंशियांची सुटका

घायाळ गोतस्कर तौफिक (डावीकडे)

नूंह (हरियाणा) – येथे दंगलीस उत्तरदायी असल्याचा आरोप असलेले काँग्रेसचे आमदार मम्मन खान यांचा मतदारसंघ असलेल्या फिरोजपूर झिरका येथे १२ ऑगस्ट या दिवशी पोलीस आणि गोतस्कर यांच्यात चकमक झाली. या चकमकीत तौफिक नावाचा गोतस्कर गोळी लागल्याने गंभीररित्या घायाळ झाला, तर अन्य गोतस्कर घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी २१ गोवंशियांची सुटका केली.

गोरक्षक दलाच्या सदस्यांनी पोलिसांना गोतस्करीविषयी माहिती दिली होती. (नेहमी गोप्रेमीच याविषयीची माहिती पोलिसांना देतात. अशी माहिती पोलिसांना का मिळत नाही ? – संपादक) गोरक्षक दलाचे सदस्य गोतस्करांच्या वाहनाचा पाठलाग करत होते. देहली वडोदरा एक्सप्रेसवेवर गाडी गावाजळ येताच पोलिसांनी गोतस्करांना थांबण्याचा इशारा केला; मात्र गोतस्करांनी वाहन थांबवले नाही. उलट त्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार चालू केला. पोलिसांनी प्रत्युत्तर देत गोळीबार करत तस्करांना रोखण्याचा प्रयत्न केला. गोतस्करांनी स्वत:ला वेढलेले पाहून खाली उतरून पळ काढला.