अविश्‍वास प्रस्तावावर मतदान झाले असते, तर अहंकारी युतीचे पीतळ उघडे पडले असते ! – पंतप्रधान नरेंद मोदी

बंगालमध्ये भाजपची पंचायतराज परिषद !

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – बंगालमधील हावडा येथे भाजपने पंचायतराज परिषदेचे आयोजन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑनलाईन’च्या माध्यमातून परिषदेला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विरोधकांनी मणीपूरच्या जनतेचा विश्‍वासघात केला आहे. विरोधकांनी अविश्‍वास प्रस्तावावर मतदान करण्यापूर्वीच सभागृहातून पळ काढला. अविश्‍वास प्रस्तावावर मतदान झाले असते, तर अहंकारी युतीचे पीतळ उघडे पडले असते.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, बंगाल पंचायत निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने खेळलेला रक्तरंजित खेळ संपूर्ण देशाने पाहिला आहे. मोदी यांनी निवडणुकीच्या काळात झालेल्या हिंसाचाराविषयी तृणमूल काँग्रेस सरकारवर टीका केली. ‘तृणमूल काँग्रेसने भाजपच्या उमेदवारांना धमकावले आणि अनेक ठिकाणी मतदान केंद्रे कह्यात घेतली’, असा आरोप पंतप्रधानांनी केला. ‘आपले कार्यकर्ते बंगालचे वैभव परत आणतील’, असा विश्‍वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.