आपल्याला झोपलेल्या हिंदूंना जागे करून संपूर्ण विश्वामध्ये हिंदु राष्ट्र स्थापन कारायचे आहे. सर्व हिंदू ध्वनीक्षेपकावरून होणार्या ५ वेळेच्या अजानमुळे त्रस्त आहेत. त्याप्रमाणे आम्हीही त्रस्त होतो. ते थांबवणे आपल्या आवाक्यात नव्हते; म्हणून त्याला मोठा पर्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्यानुसार आम्ही सर्व हिंदूंनी मिळून शहरामध्ये एक ८५ फूट उंच ‘श्रीराम टॉवर’ उभारला आणि त्यावर २५ ध्वनीक्षेपक लावले. तसेच त्यावरून सकाळ-संध्याकाळ हनुमान चालीसा लावण्यात येते. यातून हिंदू एकत्र आले, तर काय होऊ शकते, हे लक्षात आले. ‘श्रीराम टॉवर’वरून प्रेरणा घेऊन परिसरातील अनेक गावांनी ‘श्रीराम टॉवर’ची मागणी केली. एका गावाच्या सरपंचांनी १ मासाच्या आत त्यांच्या गावात टॉवर उभारण्याचा निश्चय केला. हिंदूंच्या सणांवर प्रशासनाकडून अनेक निर्बंध लादले जायचे. तसेच हिंदु संस्कृतीपासून दूर चालले हाते. त्यामुळे श्रीराम युवा सेनेने हिंदूंचे सर्व महत्त्वाचे सण सार्वजनिकपणे साजरे करणे चालू केले.