अहिल्यानगर – पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथील गर्भगिरीच्या पायथ्याशी असलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र वृद्धेश्वर मंदिरात चोरट्यांनी मंदिरातील बाहेरच्या बाजूच्या ४ दानपेट्यांतील पैसे चोरले. ५ चोरटे मंदिराच्या दरवाज्याची कडी तोडून मंदिरात प्रवेश करत असल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. त्यांनी मंदिराच्या पाठीमागील नदीजवळ या दानपेट्या तोडून त्यांतील पैसे नेले.
मंदिरातील मुख्य गाभार्यात ज्या ठिकाणी स्वयंभू आदिनाथांचे शिवलिंग आहे, त्या ठिकाणी असलेली दानपेटी मात्र चोरट्यांना तोडता आली नाही. त्यामुळे त्यांनी ती दानपेटी तिथेच ठेवली. दुसर्या दिवशी पहाटे पुजारी आणि कर्मचारी यांना ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी तक्रार प्रविष्ट केली.
संपादकीय भूमिका
|