रतलाम (मध्यप्रदेश) मध्ये धर्मांध मुसलमानांनी पोलीस ठाण्याला घेराव घालून दिल्या ‘सर तन से जुदा’च्या घोषणा !

  • कथित इस्लामविरोधी फेसबुक पोस्टवरून मुसलमान संतप्त !

  • आरोपी मुलीच्या विरोधात गुन्हा नोंद केल्यावरही घातला गोंधळ !

(सर तन से जुदा म्हणजे डोके धडापासून वेगळे करणे)

रतलाम (मध्यप्रदेश) – येथे एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून इस्लामचा कथित अनादर केल्याचा आरोप करत काही धर्मांध मुसलमानांनी येथील पोलीस ठाण्याला ९ ऑगस्टच्या रात्री घेराव घातला. या वेळी ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देण्यात आल्या. या प्रकरणी संबंधित पोस्ट करणार्‍या मुलीच्या विरोधात गुन्हा नोंद केल्याचे पोलिसांनी दिल्यावरही धर्मांध गोंधळ घालत होते. त्यांनी ठाण्यामध्ये घुसण्याचाही प्रयत्न केला.

धर्मांधांच्या जमावाने मागणी केली की, मुलीला त्वरित अटक करण्यात यावी, तसेच तिच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात यावा. या वेळी पोलिसांनी जमावाला आश्‍वस्त केले की, सायबर पोलिसांच्या साहाय्याने आरोपी मुलीला अटक करण्यात येईल.

संपादकीय भूमिका

  • कुणाच्याही धार्मिक भावना दुखावणे निषेधार्ह आहे; परंतु अशा प्रकारे हिंसेला चिथावणी देणार्‍या धर्मांध मुसलमानांच्या विरोधातही कठोर कारवाई व्हायला हवी. गेल्या वर्षी अशाच घोेषणा देऊन अनेक हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या होत्या, हे मध्यप्रदेश पोलिसांनी लक्षात घ्यावे !
  • धर्मांध मुसलमानांच्या याच कट्टरतेला पोलीस आणि सर्व सरकारी व्यवस्था घाबरते, हे दुर्दैवी होय !