श्रीनगर – अतीवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर ६ ऑगस्टला सकाळी दरड कोसळली. त्यामुळे टी-२ बोगद्याजवळील महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर प्रशासनाने ढिगारा हटवून रस्ता वाहतुकीसाठी चालू केला.
VIDEO | Jammu-Srinagar National Highway blocked due to heavy landslide at T2 tunnel near Keela Morh in Ramban district.
(Source: Third Party) pic.twitter.com/dlGfwBB14X
— Press Trust of India (@PTI_News) August 6, 2023
१. उत्तराखंडमधील नैनितालमधील धनगढी पुलावरून पाणी वहात आहे. ५ ऑगस्टला या पुलावरून ३५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस उलटली. प्रवाशांना ‘जेसीबी’ यंत्राच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. यानंतर पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे.
२. मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यात ४ ऑगस्टला सायंकाळी धरणाचे १३ दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे रेवा येथील तराई भागात पुराचा धोका वाढला आहे. येथे गृहरक्षक दल आणि राज्य आपत्कालीन यंत्रणेचे सैनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.