सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवापूर्वी साधकाला पडलेली पूर्वसूचना दर्शवणारी स्‍वप्‍ने आणि ब्रह्मोत्‍सवाच्‍या दिवशी आलेल्‍या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ब्रह्मोत्‍सवापूर्वी पडलेली स्‍वप्‍ने

श्री. अनिकेत जमदाडे

अ. ‘ब्रह्मोत्‍सव चालू होण्‍याआधीच मला स्‍वप्‍नामध्‍ये ‘प.पू. गुरुदेव (सच्‍चिदानंद डॉ. जयंत आठवले), श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ हे तीनही गुरु रथात विराजमान आहेत’, असे दृश्‍य दिसले.

आ. त्‍यानंतर दुसर्‍या दिवशी रात्री मला स्‍वप्‍नात ‘ब्रह्मोत्‍सव कुठेतरी मैदानात आहे आणि मी तिथे गेलो आहे’, असे दिसले.

(‘साधकाला स्‍वप्‍नात दिसलेल्‍या वरील दृश्‍यांप्रमाणे प्रत्‍यक्षातही घडले.’ – संकलक)

२. ब्रह्मोत्‍सवाच्‍या वेळी आलेल्‍या अनुभूती

अ. ब्रह्मोत्‍सवाच्‍या ठिकाणी आम्‍ही जिथे बसलो होतो, तिथून मला प.पू. गुरुदेवांचा आशीर्वाद देणारा मोठा गुलाबी हात दिसला. त्‍या वेळी ते ‘सर्व साधकांना आशीर्वाद देत आहेत’, असे मला जाणवले.

आ. तेथे पुष्‍कळ चैतन्‍य असल्‍यामुळे मला आध्‍यात्मिक लाभ होत होते. गुरुदेवांच्‍या पूर्वी झालेल्‍या जन्‍मोत्‍सवाची ध्‍वनीचित्र-चकती पहात असतांना माझा भाव जागृत झाला आणि माझ्‍या डोळ्‍यांतून भावाश्रू येऊ लागले.

इ. मी रथोत्‍सवातील ध्‍वजपथकात सहभागी झालो होतो. त्‍या वेळी गुरुदेवांना पाहिल्‍यावर मला सुगंध आला. रथोत्‍सव चालू असतांना ‘सर्व देवीदेवता रथोत्‍सवाचा आनंद घेत आहेत’, असे मला जाणवले.

ई. रथोत्‍सवाच्‍या वेळी मारुतीला प्रार्थना केल्‍यावर वारा येऊ लागला. त्‍या वेळी मला जाणवले, ‘आमच्‍या हातांतील ध्‍वज अधिकच आनंदाने डोलू लागले. मारुतिराया रथोत्‍सवात वार्‍याच्‍या रूपात सहभागी होऊन आनंद घेत आहे आणि ध्‍वज फडकत आहेत.’

उ. रथोत्‍सव उन्‍हात होता; पण मला तिथे थंडावा जाणवत होता आणि गार हवा लागत होती. ‘मी उन्‍हात नाही’, असे मला जाणवत होते.

ऊ. ज्‍या ठिकाणी आम्‍ही चालत होतो, तेथील मातीचा स्‍पर्श माझ्‍या पायांना अधिक मऊ जाणवला. ‘या सेवेची संधी मिळाल्‍याबद्दल मातीलासुद्धा कृतज्ञता वाटत आहे’, असे मला जाणवले.

‘प.पू. गुरुदेवांमुळेच मला हे अनुभवता आले’, याबद्दल मी त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. अनिकेत जमदाडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक