जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे मोहरमच्या मिरवणुकीत पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणार्‍या ३३ मुसलमानांना अटक

जौनपूर (उत्तरप्रदेश) – जौनपूर जिल्ह्यातील गोधना गावामध्ये २९ जुलै या दिवशी मोहरमच्या मिरवणुकीमध्ये भारतविरोधी आणि पाकिस्तानच्या समर्थनाथ घोषणाबाजी केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ३३ लोकांना अटक केली आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला होता. त्याआधारे पोलिसांनी ही कारवाई केली. (जर व्हिडिओ प्रसारित झाला नसता, तर पोलिसांनी मिरवणुकीमध्ये असे काही घडले आहे, हे कळलेच नसते ! यातून पोलीस किती निष्क्रीय आहेत, हे लक्षात येते ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • ‘अशा देशद्रोह्यांना पाकिस्तानात पाठवा म्हणजे त्यांना पाकची स्थिती लक्षात येईल’, असे कुणी म्हटले, तर चुकीचे ठरू नये !
  • या देशद्रोह्यांच्या विरोधात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी आदी मुसलमानप्रेमी राजकीय पक्ष तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !