व्‍यष्‍टी आणि समष्‍टी साधनेतील साथी – भ्रमणभाष !

‘सध्‍याच्‍या काळात सर्वांजवळ भ्रमणभाष असतो. ‘भ्रमणभाषचा साधनेच्‍या दृष्‍टीकोनातून लाभ कसा करून घेऊ शकतो ?’, याविषयी श्री. नीलेश नागरे यांना सुचलेले विचार येथे दिले आहेत.

श्री. नीलेश नागरे

१. ‘सनातन संस्‍था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्‍या वतीने नियमितपणे ‘ऑनलाईन’ दाखवण्‍यात येणारे ‘विविध सत्‍संग, धर्मशिक्षणवर्ग, बालसंस्‍कारवर्ग आणि धर्मसंवाद’ हे कार्यक्रम आपण भ्रमणभाषमुळे ‘यू ट्यूब’ किंवा ‘फेसबुक’ याद्वारे ऐकू शकतो.

२. व्‍यष्‍टी साधनेसाठी उपयुक्‍त

आपण भ्रमणभाषचा उपयोग व्‍यष्‍टी साधनेच्‍या संदर्भात पुढीलप्रमाणे करू शकतो.

अ. ‘प्रत्‍येक घंट्याने प्रार्थना आणि कृतज्ञता व्‍यक्‍त करणे, नामजप आणि स्‍वयंसूचना सत्र करणे, विविध सत्‍संगांची वेळ’ यांची आठवण होण्‍यासाठी भ्रमणभाषवर विविध पद्धतीने वेगवेगळे ‘रिंगटोन’(आवाज) लावून गजर लावू शकतो. जेणेकरून गजर वाजताच आपल्‍याला वरील सर्व गोष्‍टी लक्षात येतील.

आ. भ्रमणभाषच्‍या पडद्यावर (वॉलपेपरवर) देवाचे चित्र किंवा गुरुदेवांचे छायाचित्र ठेवल्‍यास आपल्‍याला त्‍यांचे स्‍मरण सातत्‍याने होते.

इ. आपण दिवसभर भ्रमणभाषवर अनेक प्रकारची स्‍तोत्रे आणि प.पू. भक्‍तराज महाराज यांची भजने ऐकू शकतो.

ई. आपण भ्रमणभाषचा ‘रिंगटोन’ सात्त्विक ठेवून भगवंताची आठवण ठेवू शकतो.

उ. आपण भ्रमणभाषचा ‘कॉलर ट्यून’ सात्त्विक ठेवून आपल्‍याला भ्रमणभाष करणार्‍या व्‍यक्‍तीला भगवंताची आठवण करून देऊ शकतो.

ऊ. ‘यू ट्यूब’च्‍या माध्‍यमातून भावजागृतीसाठीचे विविध ‘व्‍हिडिओ’ आणि ‘गूगल क्रोम’च्‍या माध्‍यमातून अन्‍य संकेतस्‍थळांना (वेबसाईट्‌सना) भेट देऊन तेथील माहितीचा साधनेसाठी उपयोग करू शकतो.

ए. ‘सनातन प्रभात’चे नियमितपणे वाचन करू शकतो.

३. समष्‍टी साधनेतील साथी

अ. हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेच्‍या कार्यात महत्त्वाचा सहभाग असणारे साप्‍ताहिक आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ यांचा व्‍यापक स्‍वरूपात प्रचार करू शकतो.

आ. सनातन संस्‍था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्‍या वतीने आयोजित करण्‍यात येणारे ‘विविध सत्‍संग, बालसंस्‍कारवर्ग आणि धर्मसंवाद’ यांचा प्रचार करू शकतो.

४. वेळेची बचत होणे

अ. भ्रमणभाषमुळे आपण एकमेकांशी बोलू शकतो. आपण ‘व्‍हिडिओ कॉल’ करून एकमेकांना भेटू शकतो. आपण अन्‍य व्‍यक्‍तींना संदेश पाठवू शकतो किंवा ‘व्‍हॉट्‍स अ‍ॅप’ करून संपर्क साधू शकतो. समोरची व्‍यक्‍ती तिच्‍या वेळेनुसार आपण पाठवलेले संदेश वाचू शकते.

आ. विविध प्रकारच्‍या देयकांचे पैसे आपण ‘ऑनलाईन’ पद्धतीने भरू शकतो.

‘हे भ्रमणभाष देवते, तुझ्‍यामुळे आम्‍हा सर्व साधकांना व्‍यष्‍टी आणि समष्‍टी साधनेचे प्रयत्न जलद गतीने करता येतात. ‘तू आम्‍हा सर्व साधकांना गुरुदेवांना अपेक्षित अशी व्‍यष्‍टी आणि समष्‍टी साधना करण्‍यासाठी, तसेच हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करण्‍यासाठी सर्व प्रकारचे साहाय्‍य कर’, अशी तुझ्‍या चरणी प्रार्थना आहे.

‘गुरुदेव, वरील लेख लिहिण्‍यासाठी आपणच मला सुचवले आणि आपणच तो पूर्ण करून घेतला’, याबद्दल आपल्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– श्री. नीलेश नागरे (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के), नाशिक (३.६.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक