रामनाथी आश्रमात झालेल्‍या शिबिराच्‍या वेळी जळगाव येथील श्री. वेदांत सोनार यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

रामनाथी, (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात शिबिराच्‍या कालावधीत श्री. वेदांत अरुण सोनार यांना जाणवलेली सूत्रे आणि त्‍यांना आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

श्री. वेदांत सोनार

१. शिबिराला येण्‍यापूर्वी

१ अ. मनात स्‍वतःला पालटण्‍याची तीव्र तळमळ निर्माण होणे : ‘मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात येण्‍यापूर्वी ३६ दिवस आधी मला सौ. क्षिप्राताई जुवेकर यांचा ‘धर्मशिक्षण सत्‍संग’ ऐकण्‍याची संधी मिळाली. तेव्‍हा माझ्‍या मनात स्‍वतःला पालटण्‍याची तीव्र तळमळ निर्माण झाली.

१ आ. साधनेचे काही प्रयत्न चालू केल्‍यावर सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून दर्शन होणे : सौ. क्षिप्रा  जुवेकर ‘स्‍वभावदोष निर्मूलन’ शिकवत होत्‍या. ती प्रक्रिया पाहून ‘आपण हे करायला हवे’, असे वाटून मी प्रतिदिन नामजप आणि चुका लिहिणे इत्‍यादी साधनेचे प्रयत्न सातत्‍याने केले. तेव्‍हा मला श्री गुरुदेवांचे (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) सूक्ष्मातून दर्शन झाले.

२. शिबिराला येत असतांना माझ्‍या मनात पुष्‍कळ प्रश्‍न होते; पण येथून जात आहे, तर ज्ञानगंगा स्‍वरूप मला माझ्‍या सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळाली. आश्रमातील साधकांचे तेज, त्‍यांची शिस्‍त आणि साधेपणा असे अनेक गुण शिकता आले.

३. अनुभूती

अ. आश्रमात नामजप अत्‍यंत एकाग्रतेने आणि भावपूर्ण झाला.

आ. आश्रमातील श्रीकृष्‍णाचे चित्र बघितल्‍यावर ‘तो आपल्‍याकडे पाहून हसत आहे’, असे वाटले आणि त्‍याच्‍याकडे पाहून शांत वाटले.

इ. आश्रमाच्‍या भिंतींना हात लावला असता ‘त्‍या हलत असून श्‍वास घेत आहेत’, असे वाटले.

‘ईश्‍वरप्राप्‍तीसाठीचा मार्ग इतका सहज असू शकतो’, याची जाणीव झाली.’

– श्री. वेदांत अरुण सोनार (वय २० वर्षे), जळगाव (२४.३.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक