परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या स्‍मरणाने व्‍याकुळ होऊन भावपूर्ण कविता करणारे आणि श्री गुरूंच्‍या पादुका पाहून कृतज्ञताभावात असणारे देहली येथील श्री. देवेन पाटील !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रार्थितो मी देवा, जगाचा विसर पडावा ।

श्री. देवेन पाटील

प्रार्थितो मी देवा, जगाचा विसर पडावा ।
त्रासियले या जिवास, षड्‍रिपुंनिया ॥ १ ॥

तन-मन देहासी, सतत पडे तुझा विसर ।
परी तूची तू आनंदा, घेई समजूनी सदैव ॥ २ ॥

उद्धरीसी तू सर्वजना, व्‍यापक तू चराचरा ।
निज अंतरी वस जोपरे, मी देहलीत होत नसे ॥ ३ ॥

दिव्‍य तुझे त्रैलोक्‍य मनोहर, रूप नेत्री राहे सदा ।
तुझ्‍या कृपेचा महिमा, वर्णावा या मुखाने सदा ॥ ४ ॥

ये रे विठुराया, ये श्री जयंता माझ्‍या ।
गुरुराया, थकलो मी आता श्‍वास घेता ॥ ५ ॥

तुझ्‍या येण्‍याची वाट, मी हरिप्रसार करत पाहे ।
सदैव ध्‍येय मनी रंगे, तुझ्‍यात एकरूप होण्‍याचे ॥ ६ ॥

निळ्‍या  सावळ्‍या अनिरुद्धा, घडवी तूच मला ।
केवळ तूच मुकुंदा, अधिकारी या जिवाचा ॥ ७ ॥

– श्री. देवेन पाटील, देहली (५.७.२०१९)


भगवंता, तुझ्‍याविना नको मला काहीच आता ।

भगवंता, मायेतून वाचवूनिया तू देवळात मज आणिले ।
परी मनुष्‍याकर्षणाने मला तुज विसरविले ॥ १ ॥

सर्व या मनाचा खेळ मोहना ।
क्षमा कर या शरणार्थी जिवा ॥ २ ॥

तुजविण खरंच कुणी नसे, तूच एकटा शाश्‍वत ।
परिपूर्णता केवळ तुझ्‍यात, तरी का रहाते मन भटकत ॥ ३ ॥

नमितो सर्व आर्ततेने कृष्‍णा, यदुनंदना ।
तुझ्‍याविना सर्व अशक्‍य, याची करू शकत नाही कल्‍पना ॥ ४ ॥

नितांत तू प्रेमाचा सागर ।
मी गरीब दुःखी जीव ॥ ५ ॥

सदैव मजवरी केलेस तू प्रेम ।
तरी तुज आनंद देण्‍या पडलो मी न्‍यून ॥ ६ ॥

जवळ घे अनिरुद्धा अन् ।
आशीर्वाद दे, तुझा विसर कधी न पडो या जिवा ॥ ७ ॥

विचारांच्‍या त्रासांमुळे त्रासिले बुद्धीला ।
दृष्‍टीकोन तू अनंत देऊन यास लाव कृष्‍णमार्गाला ॥ ८ ॥

केवळ तूच आणि तूच वसे प्रत्‍येक विचारात ।
तुझ्‍याविना नको मला काहीच आता ॥ ९ ॥

– श्री. देवेन पाटील, देहली (५.७.२०१९)  ॐ

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक