१. कु. पूनम चौधरी
१ अ. त्रासदायक अनुभूती
१. ‘१०.१०.२०२० या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राचे देहली सेवाकेंद्रात आगमन झाले. त्यांच्या छायाचित्राच्या आगमनाच्या एक दिवस आधी माझा आध्यात्मिक त्रास वाढला.
२. परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राच्या आगमनानंतर दुसर्या दिवशी आश्रमातील चैतन्य पुष्कळ वाढले. ते चैतन्य मला सहन होत नव्हते.
१ आ. चांगल्या अनुभूती
१ आ १. छायाचित्राचे आगमन होण्यापूर्वी ९.१०.२०२० या रात्री मला स्वप्नात ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ देहली आश्रमात आल्या आहेत’, असे दिसले.
१ आ २. परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राचे आगमन होत असतांना २ फुलपाखरे येणे आणि एका फुलपाखराने छायाचित्राला प्रदक्षिणा घालणे : देहली आश्रमात परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्या छायाचित्राचे आगमन होत असतांना मुख्य प्रवेशद्वारावर त्यांच्या छायाचित्रासमोर एक गडद हिरवे आणि दुसरे पांढरे अशी २ फुलपाखरे आली. पांढर्या रंगाच्या फुलपाखराने परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्या छायाचित्राला प्रदक्षिणा घातली.
१ आ ३. परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राच्या आगमनामुळे मन निर्विचार होणे : छायाचित्राचे आगमन झाल्यावर माझे मन निर्विचार झाले. माझ्या मनातील अनावश्यक विचारांचे प्रमाण न्यून झाले आणि मनाला उत्साह वाटला.
१ आ ४. त्या वेळी ‘साक्षात् परात्पर गुरुदेवांचेच आगमन झाले आहे’, असे मला वाटले.’
२. श्रीमती सुमन जादोंन
अ. ‘परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र सेवाकेंद्रात आणतांना ‘साक्षात् परात्पर गुरु डॉक्टरच आले आहेत’, असे वाटत होते.
आ. छायाचित्र आले, तेव्हा मला उत्साह वाटला आणि माझ्या डोळ्यांत भावाश्रूही आले अन् संपूर्ण शरिरात एक वेगळी संवेदना अनुभवायला येत होती.’
३. श्री. प्रणव मणेरीकर
३ अ. परात्पर गुरुदेवांनी प्रार्थनेद्वारे साधकांमध्ये भाव निर्माण करणे आणि नंतर ते छायाचित्राच्या माध्यमातून सेवाकेंद्रात येणे : ‘४ वर्षांपूर्वी सद़्गुरु पिंगळेकाकांनी सेवाकेंद्रातील पूजेनंतर आम्हाला ‘हे श्रीकृष्णा, ही देहली परात्पर गुरुदेवांची आणि महर्षींची आहे’, याचे आम्हाला सतत स्मरण रहावे’, अशी एक प्रार्थना करण्यास सांगितली होती. आज परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र सेवाकेंद्रात आणले. तेव्हा लक्षात आले, ‘परात्पर गुरुदेवांनी अशा प्रकारची प्रार्थना करवून घेऊन एक प्रकारे साधकांचे गुरुस्मरण वाढवले आणि साधना (तपश्चर्या) करवून घेतली.’ सेवाकेंद्रातील साधकांमध्ये प्रथम तसा भाव निर्माण केला आणि त्यानंतर ते स्थुलातून छायाचित्राच्या माध्यमातून सेवाकेंद्रात आले.
३ आ. परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र येण्यापूर्वी मी सेवाकेंद्रात प्रवेश करत होतो, तेव्हा ‘परात्पर गुरुदेव येथे प्रत्यक्ष रहातात आणि मी या गुरुमंदिरात प्रवेश करत आहे’, असे वाटून माझी भावजागृती झाली.
३ इ. परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र सेवाकेंद्राच्या वास्तूमध्ये आणतांना ‘जय गुरुदेव ।’ हा नामजप आपोआप होत होता.’
४. कु. राशि खत्री
४ अ. परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र पुष्कळ सजीव वाटणे आणि ते सर्व साधकांकडे पाहून हसत असल्याचे जाणवणे : ‘परात्पर गुुरुदेवांच्या छायाचित्राचे सेवाकेंद्रात आगमन झाले. तेव्हा ‘प्रत्यक्ष परात्पर गुरुदेवच आले आहेत’, असे मला अनुभवायला मिळाले. परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र पुष्कळ सजीव वाटत होते. ‘परात्पर गुरुदेवांच्या डोळ्यांची हालचाल झाली आणि त्यांनी आम्हा सर्व साधकांकडे पाहून स्मितहास्य केले’, असे मला जाणवले.
४ आ. सद़्गुरु पिंगळेकाका म्हणाले, ‘‘आता स्वतः परात्पर गुरुदेवच सगुणातून येथे वास्तव्यास आले आहेत. ‘आता आमच्या प्रत्येक कृतीकडे त्यांचे स्थुलातूनही लक्ष आहे’, हे लक्षात ठेवून आम्हाला भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करायची आहे.’’
४ इ. नामजप करतांना ‘परम पूज्य डॉक्टर ।’ असा नामजप पुनःपुन्हा होणे : मी परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्रासमोर बसून नामजप करत होते. तेव्हा माझ्याकडून ‘परम पूज्य डॉक्टर ।’, हाच नामजप पुनःपुन्हा होऊ लागला.’
५. कु. रुचि पवार
५ अ. नामजप करतांना परात्पर गुरुदेवांचे देहली सेवाकेंद्रात आगमन होत असल्याचे दिसणे आणि एक सप्ताहानंतर प्रत्यक्षात गुरुदेव छायाचित्राच्या माध्यमातून येणे : ‘एका सप्ताहापूर्वी नामजप करतांना मला पुढील दृश्य दिसले, ‘परात्पर गुरुदेवांचे देहली सेवाकेंद्रात प्रत्यक्ष आगमन झाले आहे. त्यांची गाडी सेवाकेंद्रासमोर येऊन थांबली आहे. मुख्य प्रवेशद्वारावर सजावट केली आहे आणि सर्वत्र आनंद भरला आहे. सेवाकेंद्राच्या भूमीवर साक्षात् श्रीविष्णु चालत आहेत. ज्या चरणांजवळ सूक्ष्मलोक आहेत, ते चरण सेवाकेंद्राच्या एकेका पायरीवर पाऊल ठेवत आहेत.’ आज परात्पर गुरुदेव छायाचित्राच्या रूपाने सगुणातून सेवाकेंद्रात आले. तेव्हा एक सप्ताहापूर्वी जे अनुभवले, तोच अनुभव प्रत्यक्षात आला. जसे आधी पाहिले होते, तशीच सेवाकेंद्राच्या प्रवेशद्वारावर गाडी येऊन थांबली आणि छायाचित्राच्या माध्यमातून गुरुदेव आले.
५ आ. छायाचित्राच्या पूजनाच्या वेळी सर्वत्र गुरुदेवच असल्याची अनुभूती येणे : सेवाकेंद्रात प्रवेश करतांना मुख्य प्रवेशद्वाराच्या पायर्या चढण्यापूर्वी श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राचे पूजन झाले. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉक्टरांपेक्षा वेगळे काहीच नाही आणि ते माझ्या मनाच्या आत अन् बाहेर सर्वत्र आहेत’, असे मला वाटले.’
६. एक साधक
अ. ‘परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राच्या आगमनाच्या वेळी मन प्रसन्न होते आणि एखादा सण असल्याप्रमाणे माझ्यामध्ये उत्साह निर्माण झाला होता.
आ. परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्रामध्ये आज वेगळ्या प्रकारचे तेज वाटत होते.
इ. छायाचित्र लावल्यानंतर तेथे परात्पर गुरुदेवांचे प्रत्यक्ष अस्तित्व जाणवले आणि ‘ते केवळ छायाचित्र नसून साक्षात् परात्पर गुरुदेवच तेथे विराजमान आहेत’, असे जाणवत होते.’
७. कु. मनीषा माहुर
७ अ. परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राच्या पूजेच्या आधीच ‘पधारो नाथ पूजा को’ हे भजन गुणगुणले जाणे आणि प्रत्यक्ष पूजा आरंभ करण्यापूर्वी तेच भजन लावण्यात येणे : ‘१४.१०.२०२० या दिवशी मी परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राच्या पूजेच्या आधीच ‘पधारो नाथ पूजा को’ हे भजन गात होते. त्याचे मला स्वतःला भान नव्हते. प्रत्यक्ष पूजा आरंभ करण्यापूर्वी सद़्गुरु पिंगळेकाकांनीही तेच भजन लावायला सांगितले.
७ आ. ‘पूजेनंतर सद़्गुरु पिंगळेकाकांचे मुखमंडल गुलाबी झाले आहे’, असे मला वाटले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक १५.१०.२०२०)
|