|
झाबुआ (मध्यप्रदेश) – राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील आदिवासी मुलींना शहरातील कॅथॉलिक वसतीगृहात ठेवून त्यांना ‘नन’ बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार एका आदिवासी मुलीच्या छेडछाडीच्या एका प्रकरणात राज्य बाल अधिकार संरक्षण आयोगाचे पथक येथील ‘स्नेह सदन जनजातीय बालिका छात्रावास’ नावाच्या मिशनरी शाळेत पोचले असता आदिवासी मुलींच्या धर्मांतराचे षड्यंत्र उघड झाले.
१. मिळालेल्या माहितीनुसार नन बनण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार्या तीनपैकी २ मुली अल्पवयीन आहेत. मुलींच्या कुटुंबियांना यासंदर्भात विचारले असता, त्यांनी सांगितले की, मुलींना शालेय शिक्षण घेण्यासाठी आम्ही पाठवले होते.
२. आयोगाला मिळालेल्या माहितीनुसार तीनही मुली गेल्या दीड-दोन मासांपासून वसतीगृहात रहात असून वसतीगृहाच्या नोंदींमध्ये त्यांचा उल्लेख नाही. यामुळे शाळा व्यवस्थापनाची भूमिका संशयास्पद असल्याचे लक्षात येते.
३. झाबुआ बाल कल्याण समितीचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी म्हटले की, मुली अकरावी आणि बारावी यांचा अभ्यास करण्यासाठी आल्या होत्या. नियमानुसार कोणत्याही शिक्षण संस्थेमध्ये अशा प्रकारे धार्मिक कृत्य करण्याला कोणतीच अनुमती नाही.
४. जैन पुढे म्हणाले की, गरिबीचा अपलाभ उठवून मुलींच्या कुटुंबियांना प्रलोभन दाखवण्यात आले होते का ?, हे शोधावे लागेल. या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे असेल, तर नन बनण्यासाठी मुली सिद्ध कशा झाल्या ? सध्यातरी शिक्षण संस्थेच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची सिद्धता केली जात आहे.
संपादकीय भूमिकाअशा प्रकारे देशभरात मिशनरी संस्था हिंदूंच्या अडचणींचा अपलाभ उठवून त्यांना प्रलोभने देत आहेत आणि त्यांचे धर्मांतर करत आहेत. यासाठी आता कठोर राष्ट्रव्यापी धर्मांतरविरोधी कायदाच आवश्यक आहे, हे केंद्र सरकार कधी लक्षात घेणार ? |