ध्‍यान आणि जप एकमेकांचे परिपोषक आहेत !

‘जप अधिक करावा कि ध्‍यान अधिक करावे ? जपाविना ध्‍यान होत नाही. ध्‍यान ठीक केल्‍याविना जप होणार नाही; म्‍हणून जप करतांना ध्‍यान लावाल, तेव्‍हाच जप ठीक होईल आणि जप ठीक होईल, तर मग हळूहळू जपामध्‍ये मन लागेल आणि ते शांत होईल. तेव्‍हा मनाचे ध्‍यान लागेल. जपाच्‍या वेळी मन लागेल, तेव्‍हाच मन भगवदाकार बनेल. भगवदाकार बनेल, तेव्‍हा सुख (आनंद) मिळेल आणि जेथे सुख आहे तेथे मन लागते.’

(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, जून २०२०)