‘हिंदूंच्या धार्मिक संस्थांनी हिंदु धर्माची पताका उंचावण्याचे आणि धर्मरक्षणाचे कार्य केले पाहिजे. या उद्देशांसह हिंदु समाजाला धर्मासाठी पूरक व्यवस्था मिळवून देणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे; परंतु अलीकडे काही हिंदूंच्या काही धार्मिक संस्था तथाकथित ‘सर्वधर्मसमभावा’साठी पुढाकार घेत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी म्हणावे लागेल. अशा संस्था चालवत असलेल्या शैक्षणिक संस्था, तसेच त्यांच्या अंतर्गत येणारी सभागृहे येथे अन्य धर्मीय विद्यार्थ्यांचे कारण सांगून हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांना विविध अटी घालतात. हे असेच चालू राहिले, तर ‘पुढे काय होईल ?’, याचा विचार प्रत्येक हिंदूने केला पाहिजे.
एकीकडे जिहादी टोळ्या भारताचे इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘लव्ह जिहाद’, वक्फ बोर्डच्या माध्यमातून हिंदूंची भूमी लाटणे आदी गंभीर समस्या समोर आहेत. त्यातच कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने मुलांच्या अभ्यासक्रमात इस्लामला पूरक असे धडे समाविष्ट केले आणि विद्यार्थ्यांना मुसलमानांच्या सणांविषयी निबंध लिहायला सांगितला. एवढेच नव्हे, तर बकरी ईदच्या दिवशी एका शाळेत हिंदु मुलांना नमाजपठण करायला सांगितले होते. अन्य धर्मीय त्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये हिंदूंचे सण साजरे करतात का ? केवळ हिंदूंनीच सर्वधर्म समभावाचे पालन करायचे का ?
हिंदूंच्या धार्मिक संस्थांनी अशा तथाकथित सर्वधर्मसमभावाचे पालन करणे कितपत योग्य आहे ? याद्वारे अप्रत्यक्षपणे इस्लामीकरणाचा पाया रचला जात नाही का ?’, असा प्रश्न हिंदूंच्या मनात आल्यास तो चुकीचा कसा ? अशा संस्थांच्या तथाकथित धर्मनिरपेक्ष वृत्तीमुळे हिंदूंची स्थिती आणखी खालावत आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदूने पुढील भयावह काळ लक्षात घेऊन हिंदु समाजाला जागृत करायला हवे.’
– श्री. गुरुप्रसाद गौडा, मंगळुरू, कर्नाटक (६.७.२०२३)